उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई

 
crime

उस्मानाबाद  : अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 27 जुलै रोजी 11 ठिकाणी छापे टाकले. यावेळी पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन गावठी दारु निर्मीतीचा द्रव पदार्थ जागीच ओतून नष्ट केला. छाप्यांतील व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई काद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात खालील प्रमाणे गुन्हे नोंदवले आहेत.

1) कळंब पो.ठा. च्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले असता यात मार्केट यार्ड, कळंब येथील कमलबाई बापू पवार ह्या 07.00 वा. सु. आपल्या घरासमोरील अंगणात गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीणाचा आंबवलेला 250 लिटर द्रव पदार्थ अंदाजे 10,000 ₹ किंमतीचा बाळगलेल्या तर गायरान पारधी पिढी, ईटकुर, ता. कळंब येथील जयरी गोरख शिंदे ह्या 09.26 वा. सु. आपल्या घरासमोरील अंगणात गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रणाचा आंबवलेला 200 लिटर द्रव पदार्थ अंदाजे 10,000 ₹ किंमतीचा बाळगलेल्या असताना आढळल्या.

2) बेंबळी पो.ठा. च्या पथकाने तीन ठिकाणी छापे टाकले असता यात भिमनगर, पाटोदा येथील लक्ष्मण दामु गायकवाड हे 11.00 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर 1,260 ₹ किंमतीची देशी- विदेशी दारु बाळगलेले तर कनगरा ग्रामस्थ- अमोल दिलीप इंगळे हे 11.45 वा. सु. गावातील एका पत्रा शेडमध्ये अंदाजे 1,400 ₹ किंमतीच्या 20 बाटल्या देशी दारु बाळगलेले तसेच शिवगुरुनगर, चिखली येथील लक्ष्मण वामन जाधव हे 12.15 वा. सु. आपल्या घरामागील जागेत 840 ₹ किंमतीच्या 12 बाटल्या देशी दारु बाळगलेले असताना आढळले.

3) ढोकी पो.ठा. च्या पथकाने तीन ठिकाणी छापे टाकले असता यात काजळा पाटी, वानेवाडी येथील अनुसया अनिल पवार ह्या 15.30 वा. सु. अंदाजे 6,000 ₹ किंमतीची 100 लि. गावठी दारु बाळगलेल्या तर ढोकी येथील गणा उजन्या काळे हे 17.30 वा. सु. ढोकी येथील जुने पेट्रोल पंपाजवळील शेडमध्ये 4,800 ₹ किमतीची 60 लि. गावठी दारु बाळगलेले तसेच तडवळा (कसबे) येथील सिताबाई शिवाजी काळे ह्या 16.00 वा. सु. आपल्या घरासमोर अंदाजे 5,022 ₹ किंमतीची देशी- विदेशी दारु बाळगलेल्या असताना आढळल्या.

4) परडा पो.ठा. च्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले असता देवळाली, ता. भुम येथील अंबिका विलास काळे ह्या 15.15 वा. सु. गावातील भातांबरे रस्त्यालगत अंदाजे 13,100 ₹ ‍किंमतीची गावठी दारु बाळगलेले तर वागेगव्हाण, ता. परंडा येथील परसुराम येडबा सौंदळे हे 18.20 वा. सु. गावातील आपल्या पडिक घराच्या जागेत अंदाजे 1,920 ₹ किंमतीच्या 24 बाटल्या देशी दारु बाळगलेले असताना आढळले.

5) उस्मानाबाद आनंदनगर च्या पथकास गडदेवपाटी, ता. उस्मानाबाद येथील तात्या लक्ष्मण काळे हे 18.45 वा. सु. उस्मानाबाद बस स्थानकासमोरील रस्त्याने मोटारसायकलवरुन देशी- विदेशी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने वाहून नेत असताना आढळले. यावर पथकाने मोटारसायकलसह अवैध मद्य असा एकुण 48,000 ₹ चा माल ताब्यात घेतला.

From around the web