उस्मानाबाद जिल्ह्यात पाच ठिकाणी अवैध मद्य विरोधी कारवाई

 
crime

उस्मानाबाद -    अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 08 सप्टेंबर रोजी 05 ठिकाणी छापे टाकले. या छाप्यातील देशी दारुच्या 16 बाटल्या, 200 लि. गावठी दारु व 15 लि. शिंदी हा अंमली द्रव जप्त करुन घटनास्थळी आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 200 लि. आंबवलेला द्रव पदार्थ हा नाशवंत असल्याने जागीच ओतून नष्ट केला. ओतून नष्ट केलेल्या द्रव पदार्थासह जप्त मद्याची अंदाजे किंमत 24,400 ₹ असून छाप्यादरम्यान संबंधीत व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65 (ई) अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात खालील प्रमाणे गुन्हे नोंदवले आहेत.

1) कळंब पो.ठा. च्या पथकाने मार्केट यार्ड, कळंब येथे 13.20 वा. सु. छापा टाकला असता तेथील रहीवासी- गिता विक्रम पवार ह्या मार्केट यार्ड परिसरात 150 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या असताना आढळल्या.

 2) वाशी पो.ठा. च्या पथकाने वाशी येथील बाजार मैदान परिसरात 14.45 वा. सु. छापा टाकला असता वाशी ग्रामस्थ- हिराबाई रामदास पवार ह्या बाजार कट्ट्याजवळ गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत आंबवलेला 200 लि. द्रव पदार्थ व 35 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या असताना आढळल्या.

 
3) उमरगा पो.ठा. च्या पथकाने उमरगा येथील बालाजी मंदीराजवळ 18.30 वा. सु. छापा टाकला असता गौतमनगर, उमरगा येथील- प्रविण बळीराम चौगुले हे 15 लि. शिंदी हा अंमली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.

 
4) लोहारा पो.ठा. च्या पथकाने कास्ती (बु.), ता. लोहारा येथे 17.25 वा. सु. छापा टाकला असता कास्ती (बु.) ग्रामस्थ- गौतम तात्याराव भंडारे हे आपल्या राहत्या घरासमोर 180 मि.ली. क्षमतेच्या 16 बाटल्या देशी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.

 5) उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पथकाने शहरातील जिजामाता उद्यानाजवळ 11.45 वा. सु. छापा टाकला असता झोरी गल्ली, उस्मानाबाद येथील- संतोष अण्णाराव हासाळे हे 15 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.

जुगार विरोधी कारवाई

कळंब : इंदीरानगर, कळंब येथील- युसूफ जफर सय्यद हे दि. 08.09.2022 रोजी 17.15 वा. सु. छ. छत्रपती शिवाजी महाराज चौक, कळंब येथे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 2,560 ₹ रोख रक्कम बाळगलेले असताना कळंब पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web