उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य आणि जुगार विरोधी कारवाई

 
crime

उस्मानाबाद -   अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 18.10.2022 रोजी 12 ठिकाणी छापे टाकले. या छाप्यातील देशी- विदेशी दारुच्या 82 बाटल्या व सुमारे 128 लि. गावठी दारु असे मद्य जप्त केले. या जप्त मद्याची एकुण अंदाजे 17,750₹ किंमत असून छाप्यादरम्यान संबंधीत व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65 (ई) अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात खालील प्रमाणे गुन्हे नोंदवले आहेत.

1) मुरुम पो.ठा. च्या पथकाने तीन ठिकाणी छापे टाकले. यात कडदोरा ग्रामस्थ- निळकंठ शिंदे हे 12.40 वा. सु. गावातील आपल्या पत्रा शेडमध्ये 27 लि. गावठी दारु बाळगलेले, तर नळवाडी ग्रामस्थ- सचिन जमादार हे 15.15 वा. सु. दाळींब शिवारातील नळवाडी फाटा येथील एका ढाब्याजवळ 22 लि. गावठी दारु बाळगलेले, तर अचलेर ग्रामस्थ- बाळु उपासे हे 17.35 वा. सु. गावातील बंडगर गल्लीत 22 लि. गावठी दारु बाळगलेले असताना पथकास आढळले.

2) परंडा पो.ठा. च्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले. यात डोमगाव ग्रामस्थ- सिंधु काळे या 17.00 वा. सु. गावातील आपल्या पत्रा शेडमध्ये 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 24 सिलबंद बाटल्या व 05 लि. गावठी दारु बाळगलेल्या, तर नालगाव ग्रामस्थ- विलास करळे हे 19.30 वा. सु. गावातील एका टपरीजवळ 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 14 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना पथकास आढळले.

3) उस्मानाबाद ग्रामीण पो.ठा. च्या पथकास उपळा ग्रामस्थ- भारतबाई पवार या 10.30 वा. सु. उपळा शिवारातील पडवळ यांच्या शेतातील पत्रा शेडसमोर 10 लि. गावठी दारु बाळगलेल्या असताना आढळल्या.

4) बेंबळी पो.ठा. च्या पथकास विजयनगर, बेंबळी येथील- बालाजी शिंदे हे 11.30 वा. सु. गावातील उस्मानाबाद रस्त्यालगतच्या शिवशाही ढाब्याजवळ देशी दारुच्या 13 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.

5) अंबी पो.ठा. च्या पथकास सोनारी, ता. परंडा येथील- महारुद्र सुरवसे हे 12.00 वा. सु. सोनारी येथील कारखानापरिसरातील एका शेडजवळ देशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.

6) येरमाळा पो.ठा. च्या पथकास बरमाचीवाडी, ता. कळंब येथील- बालाजी महाजन हे 19.15 वा. सु. गावातील मोहा रस्त्यालगत आबांचा ढाबा येथे 180 मि.ली. क्षमतेच्या विदेशी दारुच्या 07 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.

7) आनंदनगर पो.ठा. च्या पथकास रमाईनगर, उस्मानाबाद येथील- राहुल पवार हे 19.10 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर 30 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.

8) उमरगा पो.ठा. च्या पथकास त्रिकोळी, ता. उमरगा येथील- दत्ता तेलंग हे 19.00 वा. सु. गावातील आपल्या घरासमोर 12 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.

9) नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास बोरगाव (तु.), ता. तुळजापूर येथील- सलीम शेख हे 19.10 वा. सु. बोरगाव बस स्थानकामागील बाजूस देशी दारुच्या 09 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.

जुगार विरोधी कारवाई

 
जुगार विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 18.10.2022 रोजी 09 ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात आढळलेले जुगार साहित्यासह रोख रक्कम असा एकुण 10,460 ₹ चा माल जप्त करण्यात आला. यावरुन 09 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 09 गुन्हे खालीलप्रमाणे दाखल करण्यात आले आहेत.

1) उस्मानाबाद शहर पो.ठा. च्या पथकाने शहरात दोन ठिकाणी छापे टाकले. यात इंदिरानगर येथील- सोनु काळे हे 13.45 वा. सु. राहत्या परिसरातील श्रावणी पानस्टॉल येथे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1,510 ₹ रक्कम बाळगलेले, तर उस्मानाबाद येथील- मैनोद्दीन तांबोळी हे त्या वेळी ताजमहाल टॉकीजजवळ कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 730 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

2) येरमाळा पो.ठा. च्या पथकास बारातेवाडी, ता. कळंब येथील- प्रदीप बाराते हे 13.40 वा. सु. येरमाळा बस स्थानकाजवळ कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 2,240 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

3) कळंब पो.ठा. च्या पथकास भोईगल्ली, कळंब येथील- गोविंद काजळे हे 11.40 वा. सु. कळंब येथील ढोकी रस्त्यालगतच्या एका पानटपरीमध्ये मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1,350 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

4) मुरुम पो.ठा. च्या पथकास सुपतगाव, ता. उमरगा येथील- सोमनाथ लामजणे हे 11.30 वा. सु. गावातील एका हॉटेजसमोर मटका जुगार चालवण्याच्या सहित्यासह 720 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

5) वाशी पो.ठा. च्या पथकास ईट, ता. भुम येथील- बापु डोंबाळे हे 16.10 वा. सु. गावातील दिप हॉटेलसमोर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या सहित्यासह 570 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

6) उमरगा पो.ठा. च्या पथकास बालाजीनगर, उमरगा येथील- वैजिनाथ फुकटे हे 18.30 वा.सु. उमरगा शहरात मटका जुगार चालवण्याच्या सहित्यासह 1,450 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

7) शिराढोन पो.ठा. च्या पथकास पाडोळी, ता. कळंब येथील- महादेव तुंदारे हे 19.10 वा. सु. गावातील तुळजाभवानी हॉटेजवळ मिलन नाईट मटका जुगार चालवण्याच्या सहित्यासह 880 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

8) आनंदनगर पो.ठा. च्या पथकास उस्मानाबाद येथील- राजाभाऊ कांबळे हे 19.00 वा. सु. शहरातील तेरणा महाविद्यालय परिसरातील एका गाळ्यात मिलन नाईट मटका जुगार चालवण्याच्या सहित्यासह 1,010 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

From around the web