उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य आणि जुगार  विरोधी कारवाई

 
crime

ढोकी  : दुधगाव, ता. उस्मानाबाद येथील- वसंत माणिक पवार हे दि. 07.10.2022 रोजी 18.00 वा. सु. दुधगाव येथील आपल्या पत्रा शेडसमोर अंदाजे 8,600 ₹ किंमतीचा गावठी दारु निर्मीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला द्रव पदार्थ व गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना ढोकी पो. ठा. च्या पथकास आढळले.

भुम  : सोनगिरी, ता. भुम येथील- बायडाबाई शिवाजी काळे या दि. 07.10.2022 रोजी 16.40 वा. सु. सोनगिरी येथील आपल्या राहत्या पत्रा शेडसमोर गावठी दारु निर्मीती करत असतांना अंदाजे 4,000 ₹ किंमतीचा गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे 80 लि. द्रव पदार्थ बाळगलेल्या असताना भुम पो.ठा. च्या पथकास आढळल्या.

 
उस्मानाबाद
 : कसई, ता. तुळजापूर येथील- विनोद नामदेव कोनाळे हे दि. 07.10.2022 रोजी 19.30 वा. सु. कसई शिवारातील ‘हॉटेल विराज फॅमिली गार्डन’ मध्ये अंदाजे 5,850 ₹ किंमतीचे देशी- विरेशी मद्य अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आढळले.

अंबी : लंगोटवाडी, ता. परंडा येथील- माउली शिवाजी कासारे हे दि. 07.10.2022 रोजी 13.30 वा. सु. लंगोटवाडी येथील ‘धनश्री हॉटेल’ च्या आडोशाला 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना अंबी पो.ठा. च्या पथकास आढळले.

            यावरुन पोलीसांनी घटनास्थळावरील गावठी दारु निर्मीतीचा द्रव पदार्थ हा नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट केला तर अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65 (ई), 66 (फ) अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.

आणि विरोधी कारवाई.”

लोहारा  : सास्तुर, ता. लोहारा येथील- रंगनाथ व्यंकट चिवरे हे दि. 07.10.2022 रोजी 14.30 वा. सु. क्रांती चौक, सास्तुर येथील आपल्या पानटपरीसमोर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 610 ₹ रोख रक्कम बाळगलेले असताना लोहारा पो.ठा. च्या पथकास आढळले.

नळदुर्ग  : रामवाडी, ता. सोलापूर (दक्षिण) येथील- उमेश शिवाजी गायकवाड हे दि. 07.10.2022 रोजी तुळजापूर तालुक्यातील गंधोरा शिवारात नळदुर्ग ते तुळजापूर रस्त्यालगत सुरट मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1,150 ₹ रोख रक्कम बाळगलेले असताना नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले.

भुम : वालवड, ता. भुम येथील- शंकर शहाजी पाटुहे हे दि. 07.10.2022 रोजी 17.10 वा. सु. वालवड येथील गणेगाव रस्त्यालगत एका झाडाखाली कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 730 ₹ रोख रक्कम बाळगलेले असताना भुम पो.ठा. च्या पथकास आढळले.

            यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्या गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web