उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार आणि अवैध मद्य विरोधी कारवाई
उस्मानाबाद - जुगार विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी दि. 19.05.2022 रोजी जिल्हाभरात छापे टाकून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात पुढील प्रमाणे 6 गुन्हे नोंदवले आहेत.
1) उमरगा पोलीसांना जकेकूर ग्रामस्थ- मोहंमद मुनीर व उमरगा ग्रामस्थ- हुसेन शेख हे दोघे भाजी मार्केट, उमरगा येथे दोन वेगळ्या ठिकाणी मिलन नाईट मटका जुगार साहित्यासह एकत्रीत रक्कम 2,410 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.
2) उस्मानाबाद (श.) पोलीसांना राजु पारशी हे देशपांडे स्थानक येथील भाजी मंडई येथे कल्याण मटका जुगार साहित्यासह 870 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.
3) उस्मानाबाद (ग्रा.) पोलीसांना सोलापूर येथील- धनराज गोरे व उस्मानाबाद येथील- गफार शेख हे दोघे गडपाटी येथील एका हॉटेलसमोर टायगर चक्री मटका जुगार साहित्यासह 5,720 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.
4) तुळजापूर पोलीसांना काक्रंबा ग्रामस्थ- फेरोज अन्सारी, होनाळा ग्रामस्थ- बालाजी जाधव व तुळजापूर ग्रामस्थ- शहाजी कवडे हे तीघे काक्रंबा गावातील एका दुकानाजवळ कल्याण मटका जुगार साहित्यासह 20,180 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.
5) लोहारा पोलीसांना जेवळी (उ.) ग्रामस्थ- संगाप्पा होनाजे हे गावातील बस थांब्याजवळ कल्याण मटका जुगार साहित्यासह 520 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.
अवैध मद्य विरोधी कारवाई
अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी दि. 19.05.2022 रोजी जिल्हाभरात छापे मारुन छाप्यातील अवैध मद्य जप्त करुन 4 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात खालील प्रमाणे 3 गुन्हे नोंदवले आहेत.
1) उमरगा पोलीसांना देवेंद्र कलमले हे बिरुदवे मंदीरामीगील आल्या घरासमोर 50 लि. हातभट्टी दारु बाळगलेले असताना आढळले.
2) नळदुर्ग पोलीसांना आरळी ग्रामस्थ- आप्पा कचरे व नांदुरी ग्रामस्थ- बालाजी कोळी हे काळेगाव शिरातील आपल्या शेतात 10 बाटल्या देशी दारु बाळगलेले असताना आढळले.
3) उस्मानाबाद (ग्रा.) पोलीसांना कव्हे, ता. बार्शी येथील संतोष तेलंग हे अंबेजवळगा शिवारात 22 लि. शिंदी हे अंमली द्रव बाळगलेले असताना आढळले.