उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार आणि अवैध मद्य विरोधी कारवाई

 
crime

उस्मानाबाद  - जुगार विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी दि. 18.05.2022 रोजी जिल्हाभरात छापे टाकून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात पुढील प्रमाणे 12 गुन्हे नोंदवले आहेत.

1) उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांच्या पथकास सोनु काळे व इरफान शेख हे दोघे इंदीरानगर येथील एका पानटपरीमध्ये कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य, एक भ्रमणध्वनी व 1,060 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

2) तुळजापूर पोलीसांना विजय इंगवे हे दिपक चौक, तुळजापूर येथे कल्याण मटका जुगार साहित्यासह 1,950 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

3) उस्मानाबाद (श.) पोलीसांना सलिम शेख हे वैराग नाका येथील गायरान जमीन येथे कल्याण मटका जुगार साहित्यासह 1,230 ₹ बाळगलेले असताना आढळले.

4) मुरुम पोलीसांना संजय कांबळे हे आष्टामोड येथे कल्याण मटका जुगार साहित्यासह 840 ₹ रक्कम, अमिन जमादार हे तुगाव येथील चौकात कल्याण मटका जुगार साहित्यासह 1,310 ₹ रक्कम तर दुधाराम सगर हे सुंदरवाडी गावातील मंदीराजवळ कल्याण मटका जुगार साहित्यासह 1,500 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

5) उस्मानाबाद (ग्रा.) पोलीसांना संतोश मुंढे हे येडशी येथील सोनेगांव रस्त्यालगतच्या एका पानटपरीसमोर कल्याण मटका जुगार साहित्यासह 970 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

6) उमरगा पोलीसांना सादिक जेवळे हे इंदीरा चौक, उमरगा येथे टाईम बाजार मटका जुगार साहित्यासह 1,060 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

7) आनंदनगर पोलीसांना वसंत राठोड, शहाजी मुंढे, महादेव पवार हे तीघे शिंगोली लमाण तांडा येथील वसंत राठोड यांच्या घरासमोर तिरट जुगार खेळत असताना जुगार साहित्यासह 650 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

8) परंडा पोलीसांना संभाजी जाधवर हे तांबेवाडी बस स्थानकाजवळ कल्याण मटका जुगार साहित्यासह 2,260 ₹ रक्कम बाळगले असताना आढळले.

9) लोहारा पोलीसांना खदीर सय्यद हे लोहारा येथील आपल्या टपरीसमोर मुंबई मेन बाझार मटका जुगार साहित्यासह 830 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

अवैध मद्य विरोधी कारवाई.

अवैध मद्य विक्री विरुध्द उस्मानाबाद पोलीसांनी दि. 18.05.2022 रोजी जिल्हाभरात छापे मारुन छाप्यातील अवैध मद्य जप्त करुन 8 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात खालील प्रमाणे 8 गुन्हे नोंदवले आहेत.

1) उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उमरगा यांच्या पथकास कुन्हाळी ग्रामस्थ- मंजुळा मंमाळे या त्रिकोळी येथील आपल्या शेतात हातभट्टी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत 1,750 लि. द्रव पदार्थ व 95 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या असताना आढळल्या.

2) उमरगा पोलीसांना माडज ग्रामस्थ- भगवान फुगटे हे आपल्या शेत गोठ्यात 13 लि. हातभट्टी दारु तर गुंजोटी ग्रामस्थ- रुकमय्या तेलंग हे गावातील कॅनलजवळ 10 लि. हातभट्टी दारु व 9 लि. शिंदी हे अंमली द्रव बाळगलेले असताना आढळले.

3) तामलवाडी पोलीसांना सोलापूर येथील सुनिल राठोड हे वडगांव (काठी) शिवारात 14 बाटल्या देशी दारु व 10 लि. हातभट्टी दारु तर दहीवडी ग्रामस्थ- भारत भालशंकर हे आपल्या घरासमोर 16 बाटल्या देशी दारु बाळगलेले असताना आढळले.

4) आनंदनगर पोलीसांना लमाण तांडा, शिंगोली ग्रामस्थ- तुळसाबाई राठोड या तांडा परिसरात 4 बाटल्या देशी दारु व 15 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या असताना आढळल्या.

5) मुरुम पोलीसांना बेळंब तांडा ग्रामस्थ- विनोद चव्हाण हे गावातील एका किराणा दुकानामागे 18 बाटल्या विदेशी व बियर दारु बाळगलेले असताना आढळले.

6) परंडा पोलीसांना वांगी (बु.) ग्रामस्थ- रविंद्र पालके हे माणकेश्वर फाटा येथील एका हॉटेलमध्ये 27 बाटल्या देशी दारु बाळगलेले असताना आढळले.

From around the web