उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार आणि अवैध मद्य विरोधी कारवाई

 
crime
जुगार विरोधी कारवाई

जुगार विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी दि. 16.05.2022 रोजी जिल्हाभरात छापे टाकून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात पुढील प्रमाणे गुन्हे नोंदवले आहेत.

1) उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कळंब यांनी ढोकी येथे दोन ठिकाणी छापे टाकले. यावेळी दत्तनगर ढोकी येथील सिध्दार्थ शिंदे यांच्या दुकानाजवळ सिध्दार्थ यांसह तीन पुरुष हे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 10,310 ₹ रक्कम तर खयुम सय्यद यांच्या ढोकी येथील दुकानाजवळ खयुम यांसह पाच पुरुष हे ऑनलाईन फन टारगेट जुगार साहित्यासह 1,06,110 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

2) स्था.गु.शा. च्या पथकास बलभीम विरुदे हे लोहारा पंचायतसमिती समोरील टपरीत मुंबई मिलन मटका जुगार साहित्यासह 12,390 ₹ रक्कम तर लक्ष्मण जाविर यांसह तीन पुरुष हे उमरगा बस स्थानकाजवळील एका गल्लीत कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 13,000 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

3) उमरगा पोलीस ठाण्याच्या पथकास संतोष काळे व गोविंदराव बिराजदार हे दोघे उमरगा येथील प्रभात हॉटेलजवळील कॉलनीत कल्याण मटका जुगार साहित्यासह 2,040 ₹ रक्कम तर भिमाशंकर कवठे हे उमरगा येथे एका हॉटेलसमोर कल्याण मटका जुगार साहित्यासह 1,560 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

4) अंबी पोलीस ठाण्याच्या पथकास सुनिल शेरे हे उंडेगाव बस थांबाजवळ कल्याण मटका जुगार साहित्यासह 2,020 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

अवैध मद्य विरोधी कारवाई

अवैध मद्य विक्री विरुध्द उस्मानाबाद पोलीसांनी दि. 16.05.2022 रोजी जिल्हाभरात छापे मारुन छाप्यातील अवैध मद्य जप्त करुन 10 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात खालील प्रमाणे 10 गुन्हे नोंदवले आहेत.

1) शिराढोन पोलीसांना दिपक नरके हे निपानी येथील एका हॉटेलमागे 18 बाटल्या देशी दारु, लक्ष्मण कनडे हे हासेगाव शिवारातील एका हॉटेलजवळ 20 बाटल्या देशी दारु तर उत्तम पांचाळ हे नायगाव शिवारातील एका शेतात 58 बाटल्या देशी- विदेशी दारुच्या बाटल्या बाळगलेले आढळले.

2) उमरगा पोलीसांना राहुल गटकांबळे, नागनाथ सुरवसे हे दोघे उमरगा शहरात दोन ठिकाणी एकुण 20 लि. हातभट्टी दारु तर गोपाळ जाधव हे जाधवनगर तांडा येथील आपल्या घराजवळ 40 लि. हातभट्टी दारु बाळगलेले असताना आढळले.

3) कळंब पोलीसांना तोळाबाई पवार या शेळी बाजार मैदान, कळंब येथे गावठी हातभट्टी दारु निर्मीतीचा 70 लि. गुळ-पाणी मिश्रणाचा द्रव पदार्थ व 10 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या असताना आढळल्या.

4) भुम पोलीसांना कलमाबाई ईटकर या सुकटा येथील आपल्या घरासमोर 12 बाटल्या देशी दारु बाळगलेल्या असताना आढळल्या.

5) मुरुम पोलीसांना सचिन बारुळे हे गाव शिवारात 18 बाटल्या विदेशी दारु बाळगलेले असताना आढळले.

6) येरमाळा पोलीसांना भागवत काळे हे उमरापाटी येथील आपल्या घरासमोर 23 लि. हाभट्टी दारु बाळगलेले असताना आढळले.

From around the web