उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार आणि अवैध मद्य विरोधी कारवाई

 
crime

उस्मानाबाद : जुगार प्रकरणी उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 28.02.2022 रोजी 4 ठिकाणी छापे टाकून 10 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे 4 गुन्हे खालील प्रमाणे नोंदवले आहेत.

1) मुर्शदपुर, ता. लोहारा येथील सुरेश माने, भास्कर मोरे, गजेंद्र चेंडकाळे, बालाजी कदेरे, अनिल बलसुरे हे सर्व गावातील एका दुकाजवळील शेडमध्ये तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहित्यासह 1,545 ₹ रक्कम बाळगलेले असताना लोहारा पो.ठा. च्या पथकास आढळले.

2) उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उमरगा यांच्या पथकाने  शहरातील बस्थानकामागील गल्लीत छापा टाकला असता यात हमीदनगर, उमरगा येथील सादीक जेवळे हे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 3,450 ₹ रक्कम बाळगलेले आढळले.

3) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उमरगा शहरातील माळी कॉम्प्लेक्स जवळील गल्लीत छापा टाकला असता ग्रामस्थ- प्रदिप हसुरे, रामा जाधव, नामदेव कांबळे हे तीघे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 30,700 ₹ रक्कम बाळगलेले असताना पथकास आढळले.

4) उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकाने येडशी येथे छापा टाकला असता ग्रामस्थ- योगेश खंडागळे हे गावातील सोनेगाव रस्त्यालगत एका टपरीसमोर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1,270 ₹ रक्कम बाळगलेले असताना पथकास आढळले.

अवैध मद्य विरोधी कारवाई

उस्मानाबाद  : अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय माहितीवरुन उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 28.02.2022 रोजी 4 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. यात अवैध मद्य जप्त करुन 4 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे खालील प्रमाणे 4 गुन्हे नोंदवले आहेत.

1) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले असता जवळा, (नि.), ता. परंडा येथील नवनाथ चौधरी हे गावातील ईडा रस्त्यालगत एका शेडजवळ 180 मि.ली. क्षमतेच्या 19 बाटल्या देशी दारु व 25 लि. शिंदी हे अंमली द्रव बाळगलेले तर ईडा, ता. भुम येथील अमोल भोसले हे गाव शिवारातील साखरकारखान्यासमोर 180 मि.ली. क्षमतेच्या 40 बाटल्या देशी- विदेशी दारु बाळगलेले असताना आढळले. यावरुन पोलीसांनी त्यांच्याविरुध्द परंडा पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

2) इटकळ, ता. तुळजापूर येथील शंकर मडके हे गावातील एका हॉटेलजवळ 24 लि. हातभट्टी दारु बाळगलेले असताना नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी त्यांच्याविरुध्द नळदर्गु पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

3) शिंगोली, ता. उस्मानाबाद येथील लताबाई पवार या गावा शिवारात 35 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या असताना आनंदनगर पो.ठा. च्या पथकास आढळल्या. यावरुन पोलीसांनी त्यांच्याविरुध्द आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

From around the web