उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार आणि अवैध मद्य विरोधी कारवाई

 
crime

भुम : अक्षय गुरुनाथ चव्हाण, रा. भुम हे दि. 22.09.2022 रोजी 17.00 वा. सु. पाथ्रुड येथील हॉटेल साई समोर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 690 ₹ रोख रक्कम बाळगलेले असताना भुम पो.ठा. च्या पथकास आढळले.

वाशी  : जुनी हवेली, वाशी येथील- रमेश लिंबराज मोळवणे हे दि. 22.09.2022 रोजी वाशी येथील शासकीय धान्य गुदामाजवळील ओट्यावर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 770 ₹ रोख रक्कम बाळगलेले असताना वाशी पो.ठा. च्या पथकास आढळले.

उमरगा  : कदमापुर, ता. उमरगा येथील- विजय सुभाष पाटील हे दि. 22.09.2022 रोजी 19.40 वा. सु. कुन्हाळी गावातील कासारशिरसी रस्त्यालगत कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1,300 ₹ रोख रक्कम बाळगलेले असताना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.

            यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.

अवैध मद्य विरोधी कारवाई

 ढोकी  : अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान ढोकी पोलीस ठाण्याच्या पथकाने दि. 22.09.2022 रोजी कोंड गावात 5 ठिकाणी छापे टाकले. यात कोंड ग्रामस्थ- फातीमा जगदीश जाधव या 13.15 वा. सु. गावातील पाण्याच्या टाकीजवळ 20 लि. गावठी दारु बाळगलेल्या, तर श्रावण श्रीपती जाधव हे 13.30 वा. सु. कोंड येथील तलावाजवळ 75 लि. गावठी दारु बाळगलेले, तर महेश अंकुश पाटील हे 14.11 वा. सु. गावातील नितळी रस्त्यालगतच्या एका पत्रा शेडमध्ये 25 लि. गावठी दारु बाळगलेले, तर अमर सुनिल गुरव हे 14.45 वा. सु. नितळी रस्त्यालगत 30 लि. गावठी दारु बाळगलेले आणि सुनिल भागवत जमादार हे 15.15 वा. सु. गावातील सुंभा रस्त्यालगत 35 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले.

यावर पथकाने नमूद पाचही छाप्यातील एकुण 14,800 ₹ किंमतीची गावठी दारु जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65 (ई) अंतर्गत ढोकी पो.ठा. येथे स्वतंत्र 5 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web