उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार आणि अवैध मद्य विरोधी कारवाई
उमरगा : जकेकूर, ता. उमरगा येथील- महंमद खादीर मुनीर हे दि. 07.09.2022 रोजी 13.10 वा. सु. उमरगा शहरातील भाजी मार्केट परिसरात टाईम बाजार मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1,120 ₹ रोख रक्कम बाळगलेले उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.
बेंबळी : बरमगाव (बु.), ता. उस्मानाबाद येथील- उत्रेश्वर ढवळे, विठ्ठल ढवळे, सोमनाथ गोटे, युवराज रसाळ हे सर्व दि. 07.09.2022 रोजी 12.30 वा. सु. बरमगावातील एका झाडाखाली तिरट जुगार खेळत असताना जुगार साहित्यासह 1,950 ₹ रोख रक्कम बाळगलेले असताना बेंबळी पो.ठा. च्या पथकास आढळले.
उस्मानाबाद : अमृतनगर, उस्मानाबाद येथील- अजय सुदाम खिल्लारे हे दि. 07.09.2022 रोजी 20.05 वा. सु. शहरातील बिलालनगर येथील एका शेडसमोर मुंबई मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1,450 ₹ रोख रक्कम बाळगलेले असताना आनंदनगर पो.ठा. च्या पथकास आढळले.
यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.
अवैध मद्य विरोधी कारवाई
उस्मानाबाद : अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पथकाने दि. 07.09.2022 रोजी उस्मानाबाद शहरात छापा टाकला. यावेळी आगड गल्ली येथील- बाबा सत्तार शेख हे 18.40 वा. सु. तुळजापूर रस्त्यालगतच्या आलीम बिर्याणी हॉटेलच्या बाजूस अंदाजे 18,900 ₹ किंमतीची गावठी दारु बाळगलेले असताना पथकास आढळले.
उमरगा : बालाजीनगर, उमरगा येथील- लक्ष्मण हनमंत भाटे हे दि. 07.09.2022 रोजी 18.00 वा. सु. महात्मा फुले नगर, उमरगा येथे अंदाजे 3,900 ₹ किंमतीची शिंदी हे अंमली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.
यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65 (ई) अंतर्गत उस्मानाबाद (श.) व उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.