उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार आणि अवैध मद्य विरोधी कारवाई

 
crime

परंडा  : माणकेश्वर, ता. भुम येथील- अक्षय सुदाम शिंदे हे दि. 05.09.2022 रोजी 13.10 वा. सु. माणकेश्वर शिवारात कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 3,620 ₹ रोख रक्कम बाळगलेले असताना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले.

तुळजापूर  : काक्रंबा, ता. तुळजापूर येथील- किरण महेंद्र बंडगर हे दि. 05.09.2022 रोजी 11.40 वा. सु. काक्रंबा गावतील कमाणीसमोर सुरट मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 690 ₹ रोख रक्कम बाळगलेले असताना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले.

यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत परंडा व तुळजापूर पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

 अवैध मद्य विरोधी कारवाई

 
ढोकी  : अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान ढोकी पो.ठा. च्या पथकाने दि. 05.09.2022 रोजी 15.50 वा. सु. दत्तनगर, ढोकी येथे छापा टाकला. यावेळी ग्रामस्थ- आबा बिसराम पवार हे राहत्या परिसरात अंदाजे 36,000 ₹ किंमीचा गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत आंबवलेला सुमारे 600 लि. द्रव पदार्थ बाळगलेले असताना आढळले. यावर पथकाने गावठी दारु निर्मीतीचा द्रव पदार्थ हा नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट केला.

उमरगा  : व्यंकटेशनगर तांडा, ता. उमरगा येथील- प्रभाकर लक्ष्मण राठोड हे दि. 05.09.2022 रोजी 17.30 वा. सु. कदेर गावातील मंगल कार्यालयासमोर अंदाजे 960 ₹ किंमतीच्या 24 बाटल्या देशी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना उमरगा पो. ठा. च्या पथकास आढळले.

येरमाळा  : उपळाई, ता. कळंब येथील- भारत भिमराव मुंढे हे दि. 05.09.2022 रोजी 20.50 वा. सु. उपळाई शिवारात अंदाजे 540 ₹ किंमतीच्या 9 बाटल्या देशी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना येरमाळा पो.ठा. च्या पथकास आढळले.

यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65 (ई) (फ) अंतर्गत ढोकी, उमरगा व येरमाळा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web