उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार आणि अवैध मद्य विरोधी कारवाई
नळदुर्ग : नळदुर्ग, ता. तुळजापूर येथील- 1)अमोल मेंढके 2)बाबा काळे 3)मुनित शेख 4)रोहित डुकरे 5)रिजवान शेख 6)विजय डुकरे हे सर्व लोक दि. 04.09.2022 रोजी 02.45 वा. सु. नळदुर्ग येथील विठ्ठल रुक्मिणी मंदीराच्या सभागृहासतोरील अंगनात तिरट जुगार खेळत असताना जुगार साहित्यासह 3,550 ₹ रोख रक्कम बाळगलेले असताना नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या पथकास आढळले.
अंबी : तरटगाव, ता. जामखेड, जि. अहमदनगर येथील- शरद आत्मराम काळे हे दि. 04.09.2022 रोजी 13.10 वा. सु. तिंत्रज गावातील समाज मंदीराजवळ सुरट मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 2,260 ₹ रोख रक्कम बाळगलेले असताना अंबी पोलीस ठाण्याच्या पथकास आढळले.
यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत नळदुर्ग व अंबी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
अवैध मद्य विरोधी कारवाई
नळदुर्ग: अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या पथकाने दि. 04.09.2022 रोजी दोन ठिकाणी छापे टाकले. यात तुळजापूर तालुक्यातील किलज ग्रामस्थ- रमेश काशीनाथ ठणके व राजेंद्र शंकर जळकोटे हे दोघे 10.45 वा. सु. किलज शिवारातील सलगरा (दि.) रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एई 5139 (मो.सा. किं.अं. 15,000 ₹) वरुन अंदाजे 3,360 ₹ किंमतीच्या 180 मि.ली. क्षमतेच्या 48 बाटल्या देशी दारु अवैधरित्या वाहुन नेत असलेले आढळले. तर रहिमनगर, नळदुर्ग येथील- सुभाबाई शिवाजी राठोड ह्या 16.30 वा. सु. राहत्या कॉलनीत अंदाजे 540 ₹ किंमतीची 9 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या असताना आढळल्या.
ढोकी : अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान ढोकी पोलीस ठाण्याच्या पथकाने दि. 04.09.2022 रोजी उस्मानाबाद तालुक्यातील रुई शिवारात छापा टाकला. यावेळी रुई ग्रामस्थ- सुब्रो भाउ पवार हे दि. 18.00 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 14,900 ₹ किंमतीच्या 180 मि. ली. क्षमतेच्या 109 बाटल्या व 90 मि.ली. क्षमतेच्या 80 बाटल्या देशी दारु आणि अंदाजे 5,250 ₹ किंमतीची सुमारे 75 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.
यावरुन पोलीसांनी मद्य वाहतुकीसाठी वापरलेली मोटारसायकल व अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.