मुरुम  :  गुटखा विरोधी कारवाई

 
crime

मुरुम  : गंगाधर शिवशरण तुगावे, रा. बेळंब, ता. उमरगा हे दि. 16 मे रोजी 23.30 वा. बेळंब येथे टाटा सुमो क्र. एम.एच. 13 बी 2886 मधून मानवी आरोग्यास धोकादायक असलेला व महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत गुटखा या अन्न पदार्थाची 30 पोती असा एकुण 4,50,000 ₹ चा तंबाखुजन्य पदार्थ वाहून नेत असतांना मुरुम पोलीसांच्या पथकास आढळले. यावरुन नसरीन मुजावर यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 272, 273, 328 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम- 59 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 विद्युत पंप चोरीला 

ढोकी : कोल्हेगाव, ता. उस्मानाबाद येथील बारीकराव सदाशिव टेकाळे यांच्या गट क्र. 307 मधील शेत विहीरीवरील अँको कंपनीचा 3 अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पंप, वायर, स्टार्ट व 20 लि. डिझेल हे दि. 14- 15.05.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या बारीकराव टेकाळे यांनी दि. 18 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपहरण 

कळंब  : गंभीरवाडी, ता. कळंब येथील संतोष शिवाजी परभणे, वय 45 वर्षे यांचे दि. 17 मे रोजी 15.00 वा. सु. कळंब येथून अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरन केले आहे. अशा मजकुराच्या अनिकेत संतोष परभणे, रा. गंभीरवाडी यांनी दि. 18 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web