अचलेर : आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
मुरूम : अचलेर, ता. लोहारा येथील- अजय प्रेमसिंग गहिरवार, वय 24 वर्षे यांनी दि. 17.12.2022 रोजी 15.00 ते 16.00 वा. सु. अचलेर शिवारातील पुजारी यांचे हौदातील पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. गावकरी- सुनिता बायस, जयपालसिंग बायस, शुभम बायस, शिव बायस यांच्या वेळोवेळी होत जाचास व त्रासास कंटाळून अजय यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताची आई- छायाबाई प्रेमसिंग गहिरवार रा. नरसिंहनगर, सोलापूर यांनी दि. 20.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
दोन ठिकाणी चोरी
ढोकी : खेड, ता. उस्मानाबाद येथील सुरज भारत लोमटे यांचे अंदाजे 90,000 ₹ किंमतीचा माल त्यामध्ये सोयाबीनचे 16 कट्टे व होंडा शाईन मोटारसायकल क्र.एम.एच.14 जीबी 9238 हा दि.20.01.2023 रोजी 01.00 ते 03.00 वा. दरम्यान लोमटे यांच्या घरासमोरून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला.अशा मजकुराच्या भारत लोमटे यांनी दि.20.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद : लक्ष्मीनगर, उस्मानाबाद येथील- लक्ष्मण रावसाहेब ओमासे यांची अंदाजे 25,000 ₹ किंमतीची होंडा ॲक्टीवा मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एआर 5970 ही दि. 09.01.2023 रोजी 21.30 ते 22.00 वा. दरम्यान त्यांच्या राहत्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या लक्ष्मण ओमासे यांनी दि. 20.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.