मांडवा खून प्रकरणातील आरोपी गजाआड 

 
crime

उस्मानाबाद  : मांडवा, ता. वाशी येथील- युवराज त्रिंबक पाटील, वय 45 वर्षे यांचा दि. 11.03.2022 ते दि. 21. 03.2022 रोजी दरम्यान संशयीत व्यक्तीने अज्ञात कारणासाठी दोरीने गळा आवळून युवराज यांना ठार मारले. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात घालून सोनगीरी येथील साठवण तलावातील पाण्यात टाकला होता. अशा मजकुराच्या मयताचा पुतण्या- दत्तात्रय अरुण पाटील, रा. मांडवा, ता. वाशी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 201 अंतर्गत भूम पो.ठा. येथे गुन्हा क्र. 67/2022 हा नोंदवला आहे.

            सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी- गणेश अप्पाराव पवार, वय 37 वर्षे, देवधानोरा, ता. कळंब हा पोलीसांना तपासकामी पाहिजे असल्याचे पोलीस त्याच्या मागावर होते. तो आपले वास्त्व्य बदलत असल्याने त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. स्था.गु.शा. च्या पथकाने सदर गुन्हा तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषन व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गणेश पवार हा तडवळा व गोपाळवाडी शिवारातील आपल्या मुलीच्या शेतात वास्तव्यास असल्याचे समजले. यावर मा. पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नमूद ठिकाणी रवाना होउन पथकाने तो रहात असलेल्या तडवळा व गोपाळवाडी शिवारातून गणेश पवार यास दि. 06.12.2022 रोजी अटक करुन पुढील कार्यवाहिस्तव भुम पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी,  अपर पोलीस अधीक्षक  नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन स्था.गु.शा. च्या पोनि-  यशवंत जाधव, सपोनि-मनोज निलंगेकर, पोलीस अंमलदार- प्रकाश औताडे, उलीउल्ला काझी, जावेद काझी, शौकत पठाण, हुसेन सय्यद, पांडुरंग मस्के, वैशाली सोनवणे, अशोक कदम, बलदेव ठाकूर यांच्या पथकाने केली आहे.

From around the web