चोरीच्या समार्टफोनसह आरोपी ताब्यात
उस्मानाबाद : देवळाली, ता. कळंब येथील- बालाजी माने हे दि. 03.09.2022 रोजी 18.30 वा. सु. ढोकी पेट्रोल पंप चौकातील एका दुकानात खरेदी करताना आपला अंदाजे 20,000 ₹ किंमतीचा स्मार्टफोन टेबलवर ठेवला असता गर्दीचा फायदा घेउन तो अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. यावरुन बालाजी माने यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो.ठा. येथे गुन्हा क्र. 282/2022 रोजी भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत नोंदवला आहे.
गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोनि- रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- मनोज निलंगेकर, पोहेकॉ- जावेद काझी, वलिऊला काझी, प्रकाश औताडे, अमोल निंबाळकर, पांडुरंग मस्के, पोना- शौकत पठाण, शैला टेळे, पोकॉ- बलदेव ठाकुर यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे काल दि. 05 सप्टेंबर रोजी रुई ग्रामस्थ- प्रविण घुटे यास रुई परिसरातून ताब्यात घेतले असता चोरीचा नमूद स्मार्टफोन त्याच्या ताब्यात आढळला. यावरुन त्यास ताब्यात घेउन पुढील कार्यवाहिस्तव ढोकी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.