उस्मानाबादेत चोरीच्या मोटारसायकलसह आरोपी ताब्यात

 
s

उस्मानाबाद  :- चिट्टावाडी, ता. बिदर, राज्य- कर्नाटक येथील- सिद्राम काशिनाथ मरकुंदे यांची अंदाजे 35,000 ₹ किंमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल क्र. के.ए. 38 व्ही 1515 ही दि. 11.10.2022 रोजी रात्री 01.00 ते 05.00 वा. दरम्यान तुळजापूर येथील भक्त निवास समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली होती. अशा मजकुराच्या सिद्राम मरकुंदे यांनी दि. 14.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा क्र. 382/2022 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत नोंदवला आहे.

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास दि. 14.10.2022 रोजी गोपनिय माहिती मिळाली की, बौध्दनगर, उस्मानाबाद येथील ईसम नामे- योगेश रणजीत गायकवाड हा एक संशयीतरित्या एक मोटारसायकल बाळगून असून ती मोटारसायकल विक्री करण्यासाठी कोठेतरी घेउन जात असून तो सध्या तुळजापूर बस स्थानक परिसरात थांबलेला आहे. यावर पथकाने योगेश यास तुळजापूर बस स्थानकातून नमूद मोटारसायकलसह 20.30 वा. सु. ताब्यात घेतले असता ती मो.सा. ही उपरोक्त नमूद गुन्ह्यातीलच असल्याचे समजताच पथकाने त्याच्या ताब्यातील ती मोटारसायकल हस्तगत केली. सदर आरोपीस चोरीच्या नमूद मोटारसाकलसह पुढील कारवाईस्तव तुळजापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

            सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन पोलीस निरीक्षक  यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि- . किसन जगताप, पोलीस अंमलदार- हुसेन सय्यद, महेबूब अरब, अमोल चव्हाण, अशोक ढगारे, रविंद्र आरसेवाड यांच्या पथकाने केली आहे

From around the web