उस्मानाबादेत चोरीच्या मोटारसायकलसह आरोपी ताब्यात

 
d

उस्मानाबाद :- उस्मानाबाद येथील मयुर पॅलेस बार & लॉजिंग मध्ये काम करणारे व्यवस्थापक- शिवशंकर पंचाक्षरी स्वामी यांनी दि. 01.07.2022 रोजी 23.30 ते 02.07.2022 रोजी 01.00 वा. दरम्यान मयुर पॅलेस मधील काउन्टरमधील 1,40,000 ₹ रोख रक्कम व पॅलेस समोरील हिरो पॅशन एक्स प्रो. मोटारसायकल क्र. एम.एच. 25 झेड 0701 ही अंदाजे 30,000 ₹ किंमतीची चोरुन घेउन गेले होते. यावर मयुर पॅलेस मालक- रविकांत पांडुरंग राउत, रा. उस्मानाबाद यांनी उस्मानाबाद (श.) पो.ठा. येथे गुन्हा क्र. 211/2022 हा भा.दं.सं. कलम- 381 अंतर्गत नोंदवला आहे.

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक यांनी घटनास्थळावरील सी.सी.टि.व्हि फुटेज व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शिवशंकर पंचाक्षरी स्वामी यांस नमूद चोरीच्या मालातील मोटारसायकलसह पंढरपुर, जि. सोलापुर येथुन दि. 12 जुलै रोजी ताब्यात घेतले. सदर आरोपीस चोरीच्या नमूद मोटारसाकलसह पुढील कारवाईस्तव उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

            सदरची कामगीरी . पोलीस अधीक्षक . अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षकनवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक . रामेश्वर खनाळ यांच्या सुचनांप्रमाणे स्थागुशा चे सपोनि- . मनोज निलंगेकर, पोहेकॉ- निंबाळकर, औताडे, काझी, कवडे, पोना- पठाण, पोकॉ- ठाकुर, मोरे यांच्या पथकाने केली आहे. 

From around the web