अचलेरमध्ये चोरीच्या मोटारसायकलसह आरोपी अटकेत

 
d

मुरुम: अचलेर, ता. लोहारा येथील अमोल सोमवंशी यांच्या बंद घराचा दरवाज अज्ञात व्यक्तीने दि. 23- 24 जुलै रोजीच्या रात्री ढकलुन उघडून घरातील 10 ग्रॅम वजनाचे सवर्ण दागिने, 15,000 ₹ रोख रक्कम व घरासमोरील हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एपी 9126 ही चोरुन नेली होती. ही चोरी गावातीलच बालाजी लोहार याने केली असावी असा त्यांनी संशय व्यक्ती केला होता. अशा मजकुराच्या अमोल सोमवंशी यांच्या प्रथम खबरेवरुन गुन्हा दाखल आहे. तपासादरम्यान मुरुम पो.ठा. च्या सपोनि-  जगताप यांच्या पथकाने बालाजी लोहार यास ताब्यात घेतले असता त्याने चोरलेली नमूद मोटारसायकल अक्कलकोट येथून जप्त केली असून उर्वरीत मालाविषयी पोलीस तपास करत आहेत.

सदरची कामगीरी  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक  नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि-  जगताप, सपोफौ- नायकल, पोना- साळुंके यांच्या पथकाने केली आहे.

From around the web