गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकलसह आरोपी ताब्यात 

 
crime

उस्मानाबाद  : सिंदफळ, ता. तुळजापूर येथील गणेश लक्ष्मण गोसावी यांनी दि. 04.05.2022 रोजी 12.45 वा. सु. तुळजापूर येथील आंबेडकर चौकात त्यांच्या मोटारसायकलीस विवो स्मार्टफोन व 2.5 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने असलेली पिशवी अडकवलेली असता ती पिशवी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली होती. यावरुन गोसावी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो.ठा. गु.र.क्र. 150/ 2022 नुसर भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत नोंदवला आहे.

            गुन्हा तपासादरम्यान स्था.गु.शा. च्या पोनि-  रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि-  पवार, पोना- सय्यद, चव्हाण, टेळे, पोकॉ- आरसेवाड, अशमोड, कोळी, पठाण यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे साठेनगर, उस्मानाबाद येथील सचिन जिगणु पवार, वय 30 वर्षे यांस चोरी करण्यासाठी वापरलेल्या होंडा शाईल मोटारसायकल जप्त करुन गुन्ह्याचा उर्वरीत तपास चालू आहे.


मोबाईल चोरी 

तुळजापूर : दिलीप दरीबा रोचकरी, रा. तुळजापूर हे दि. 28.04.2022 रोजी 11.45 वा. सु. जुने बस स्थानक, तुळजापूर येथे असतांना गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या सदऱ्याच्या शिखातील सॅमसंग स्मार्टफोन रोचकरी यांच्या नकळत चोरुन नेला. अशा मजकुराच्या रोचकरी यांनी दि. 06 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web