चोरीच्या नऊ विद्युत मोटारीसह आरोपी चोवीस तासांत अटकेत

 
d

उस्मानाबाद  : उस्मानाबाद- औसा रस्त्यालगतची सुत गिरणी बंद असल्याची संधी साधून गेल्या काही महिन्यांत गिरणीतील 20 शिवण यंत्रे, शिवण यंत्रांच्या 50 विद्युत मोटारी, 250 पंखे, एक रेफ्रीजरेटर, तीन तारांच्या विद्युत वायरचे 25 वेटोळे, एक बॉयलर विद्युत मोटार, एक बोअरवेल विद्युत मोटार असे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लांबवले होते. या प्रकरणी गिरणी सुरक्षा व्यवस्थापक- पांडुरंग मुळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आज दि. 22 मे रोजी रात्री 01.00 वा. गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

            गुन्हा तपासादरम्यान स्था.गु.शा. च्या पोनि-  रामेश्वर खनाळ, सपोनि- . मनोज निलंगेकर, पोना- हुसेन सय्यद, रवि आरसेवाड, साईनाथ आशमोड यांच्या पथकाने वेगाने चक्रे फिरवून सांजा येथील सुनिल राजेंद्र पवार यास नमूद चोरीतील साहित्यापैकी शिवण यंत्रांच्या 9 विद्युत मोटारींसह ताब्यात घेतले असून उर्वरीत साहित्याविषयी व अन्य सहकाऱ्यांविषयी पोलीस तपास करत आहेत.

 चोरीच्या दोन स्मार्टफोनसह आरोपी अटकेत

अंबी : दोन स्मार्टफोन चोरीस गेल्यावरुन अंबी पो.ठा. येथे गुन्हा क्र. 31 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 379 प्रमाणे नोंद असून गुन्हा तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषन शाखेच्या मदतीने अंबी पो.ठा. चे सपोनि- श्री. आशिष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखालील पोहेकॉ- मुळे, पोकॉ- राऊत, आडसुळ यांच्या पथकाने गुन्ह्यातील चोरीच्या दोन्ही स्मार्टफोनसह परंडा तालुक्यातील डोंजा ग्रामस्थ- जाकीर मोहिनोद्दीन तांबोळी, वय 40 वर्षे यांना अटक केली आहे.

From around the web