नळदुर्गजवळ अपघात, महिला ठार 

 
crime

नळदुर्ग  : बोरमाणी, ता. सोलापुर (द.) येथील- उषाबाई मनोहर गुरव, वय 56 वर्षे ह्या विजयकुमार नागनाथ बिराजदार, रा.अण्णासाहेब पाटील नगर, ता. सोलापुर (उ.) यांचे सोबत दि. 02.01.2023 रोजी 06.30 वा. सु. नळदुर्ग येथील आलियाबाद पुलाजवळील रस्त्याने मोटारसायकल क्र.एम.एच.13 डब्ल्यु 6511 ने प्रवास करत होत्या. यावेळी विजयकुमार यांनी नमूद मोटारसायकल ही भरधाव वेगात निष्काळजीपने चालवल्याने उषाबाई ह्या खाली पडून गंभीर जखमी होउन वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाल्या. अशा मजकुराच्या माणिक गोविंद पाटील रा.कलदेवी लिंबळाता ता. उमरगा यांनी दि. 11.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

 उस्मानाबाद : कर्दळ, ता. सोलापुर (द.) येथील- ज्ञानेश्वर बाळासाहेब पवार यांनी दि.10.01.2023 रोजी 20.15 वा.सु. मोटारसायकल क्र.एम.एच.12 आर.के 3807 ही उस्मानाबाद (श.) पो.ठा. परिसरात मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

 
मारहाण 

उस्मानाबाद  : खानापुर, ता. उस्मानाबाद येथील- पिंटु नागनाथ झेंडे, वय 35 वर्षे हे दि. 07.01.2023 रोजी 10.30 वा. सु. बार्शी नाका चौक, उस्मानाबाद येथील रस्त्याने जात होते. यावेळी गावकरी- बालाजी अर्जुन झेंडे व भिमराव रानबा झेंडे या दोघांनी तेथे जाउन जुन्या राजकीय वादातुन पिंटु यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. या मारहानीत पिंटु यांच्या उजव्या हाताचा अंगठ्याचे हाड मोडून ते जखमी झाले. अशा मजकुराच्या पिंटु झेंडे यांनी दि. 11.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web