नळदुर्गजवळ अपघात, पत्नी ठार, पती जखमी
नळदुर्ग : शिंगोली, ता. उस्मानाबाद येथील- संजय रामदास चव्हाण वय 32 वर्ष व त्यांची पत्नी- श्रीदेवी संजय चव्हाण, वय 31 वर्ष हे दोघे दि.17.12.2022 रोजी 17.00 वा.सु. नळदुर्ग घाटात आलीयाबाद पुलाजवळ राष्ट्रीय महामार्ग 65 हायवे रस्त्यावर मोटरसायकल क्र.एम.एच. 25 एटी 1429 वरुन प्रवास करत होते.
यावेळी अज्ञात चालकाने मोटरसायकल क्र. एम. एच. 25 एआर 7602 ही चुकीच्या दिशेने निष्काळजीपने चालवल्याने संजय चव्हाण चालवत असलेल्या नमूद मो.सा. ला समोरून धडकली. या अपघातात श्रीदेवी संजय चव्हाण या मयत होउन त्यांचे पती गंभीर व किरकोळ जखमी झाले. या अपघातानंतर नमूद वाहनाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या संजय चव्हाण यांनी दि.26.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
अवैध मद्य विरोधी कारवाई
परंडा : लोणी, ता. परांडा येथील- राजेंद्र शिंदे हे दि. 26.12.2022 रोजी 17.25 वा.सु.गावातील आपल्या घरासमोर अंदाजे 2,100 ₹ किंमतीची 20 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले.
मुरूम - कोथळी, ता. उमरगा येथील- सदानंद जमादार हे दि. 26.12.2022 रोजी 20.30 वा.सु. कोथळी परिसरातील कलेश्वर मंदीराजवळ जामगा तांडा रोडवर अंदाजे 2,049 ₹ किंमतीची विदेशी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले.यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65 (ई) अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.