येडशी घाटात अपघात, एक ठार , एक जखमी

उस्मानाबाद : संभाजीनगर, लातूर येथील- श्रीकांत नन्नवरे यांनी दि.10.12.2022 रोजी 12.45वा. सु. येडशी घाटातील मसोबा मंदीर येथील रस्त्यावर कार क्र.एम.एच.24 बी.एल.9796 ही हयगयने व निष्काळजीपणाने चालवल्याने स्कुटर क्र.एम.एच 12 जी.एक्स 1407 हिस समोरुन धडकली.
या अपघातात घोळवेवाडी, ता. बार्शी येथील स्कुटर चालक- चंद्रकांत श्रीधर घोळवे, वय- 52 वर्षे हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- सुरज घोळवे यांनी दि. 22.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279,338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ) (ब), 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपनाचे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
उस्मानाबाद : सार्वजनिक ठिकाणी हॉटेल, हातगाड्यावरील गॅस शेगडीवर निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणे, रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणे अशा व्यक्तींवर उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 22.12.2022 रोजी एकुण 8 कारवाया केल्या. यात ढोकी येथील ग्रामस्थ 1) दिपक अनिल साळुंके 2)ज्ञानेश्वर माने 3)रियाज पटेल, तीघे रा. तेर, 4)बालाजी खैरमुंडे 5) बालाजी बारसकर 6)रामकिसन आळणे, तीघे रा. कळंब 7) सत्तार शेख, रा. ढोकी हे सर्व लोक ढोकी येथील आठवडी बाजार मैदान परिसरात आपापल्या हातगाड्यांवरील गॅस शेगडीत निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करत असताना ढोकी पो.ठा. च्या पथकास आढळले. तर नळदुर्ग येथील- अली शेख यांनी आपल्या ताब्यातील ॲपे रीक्षा क्र. एम.एच. 07 ओ 3147 हा नळदुर्ग येथील राष्ट्रीय महामार्गावर यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 285, 283 अंतर्गत ढोकी पो.ठा. येथे 7 व नळदुर्ग पो.ठा. येथे 1 असे एकुण 8 गुन्हे नोंदवले आहेत.