गोलेगांव, रत्नापूर, कन्हेरवाडी येथे अपघात , एक ठार, दोन जखमी 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : गोलेगांव, ता. वाशी येथील शहाजी अंकुश कागदे यांसोबत सुशेन अंकुश कागदे, वय 27 वर्षे हे दि. 10.01.2022 रोजी 16.00 शिंगोली शिवारातील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 वाय 4013 ने प्रवास करत होते. यावेळी शहाजी शौचास बाजूच्या झूडूपात गेले असता सुशेन हे रस्त्यावर मोटारसायकलजवळ थांबले होते. दरम्यान अज्ञात चालकाने पिकअप वाहन क्र. एम.एच. 25 पी 1508 हा निष्काळजीपने चालवल्याने सुशेन यांसह मो.सा. ला धडकल्याने सुशेन हे गंभीर जखमी होउन शासकीय रुग्णालय, उस्मानाबाद येथे उपचारादरम्यान मयत झाले. या अपघातानंतर नमूद पिकअपचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या शहाजी कागदे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : रत्नापूर, ता. कळंब येथील ग्रामस्थ- बालाजी अभिमान वाघमारे, वय 45 वर्षे हे दि. 08.02.2022 रोजी 16.30 वा. सु. जवळा गावातील रस्त्याने समोरील ट्रॅक्टर- ट्रेलरला मोटारसायकलने ओलांडून पुढे जात होते. यावेळी त्या ट्रॅक्टरच्या अज्ञात चालकाने ट्रॅक्टर निष्काळजीने अचानक वाघमारे यांच्या बाजूस वळविल्याने वाघमारे यांच्या मो.सा. ला ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने वाघमारे हे मोसासह खाली पडून ट्रेलरचे मागील चाक वाघमारे यांच्या डाव्या पायावरुन जाउन ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या बालाजी वाघमारे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : कन्हेरवाडी, ता. कळंब येथील विजय सतिष कवडे, वय 28 वर्षे हे दि. 06.02.2022 रोजी 20.45 वा. सु. हासेगांव शिवारातील रस्त्याने सायकल चालवत जात होते. यावेळी चालक- रामराजे बापु इंगोले, रा. मस्सा (खं), ता. कळंब यांनी इनोव्हा कार क्र. एम.एच. 03 डीके 9949 ही निष्काळजीपने चालवल्याने विजय यांना पाठीमागून धडकली. या अपघातात विजय यांच्या उजव्या पायाचे हाड मोडून ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या अजय सतिष कवडे, रा. कन्हेरवाडी यांनी दि. 10 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web