उस्मानाबादेत बालकाचे अपहरण , महिलेस अटक, वकील फरार 

 
crime

उस्मानाबाद - : आंध्र प्रदेशातील अनोळखी पुरुष वकीलासह एस लक्ष्मी कृष्णा यांनी दि. 06.09.2022 रोजी 11.00 वा. सु. सांजा चौक, उस्मानाबाद येथील बालगृहात असलेल्या बालकांना बनावट युआयडी आधार ओळखपत्र व दाखल्यांच्या सहायाने ताब्यात घेउन (अपहरन करुन) त्या बालकांचा अपव्यापार करण्याचा प्रयत्न केला आहे. 

अशा मजकुराच्या बालकल्याण समिती अध्यक्ष- विजकुमार माने, रा. उस्मानाबाद यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 468, 471, 370, 511, 34 अंतर्गत दि. 06.09.2022 रोजी गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी एस लक्ष्मी कृष्णा यांना अटक करण्यात आली असून पोलीस त्या अज्ञात पुरुष वकीलाचा शोध घेत आहेत.


  देवळाली गावात हाणामारी 

उस्मानाबाद : देवळाली, ता. उस्मानाबाद येथील- महादेव सुर्यवंशी व त्यांची मुले- गणेश, आण्णासाहेब यांसह नितीन कांबळे अशा चौघांनी दि. 05.09.2022 रोजी 21.15 वा. सु. गावातील चौकात जुन्या वादाच्या कारणावरुन गावकरी- सतीश बाळासाहेब सुर्यवंशी यांना शॉकअप्सर, लोखंडी गज, काठी, दगड यांनी मारहान करुन गंभीर जखमी केले. तसेच नितीन कांबळे यांनी ठार मारण्याच्या उद्देशाने कार क्र. एम.एच. 03 एक्यु 6336 ही सतीश यांच्या अंगावर घालून त्यांना जखमी केले व सतीश यांच्या जवळील 15,400 ₹ रक्कम काढून घेतली.

            याच प्रकरणात नितीन कांबळे, रा. देवळाली यांनी प्रथम खबर दिली की, नितीन हे गावातील चौकातून कारने प्रवास करत असतांना सतिश सुर्यवंशी, रा. देवळाली यांनी मोटारसायकलवर येउन कारला समोरुन धडक दिली. यावर सतिश यांसह शुभम सुर्यवंशी या दोघांनी नितीन यांना जातीवाचक शिवीगाळ करुन ठार मारण्याच्या उद्देशाने नितीन यांच्या डोक्यात लोखंडी गज व दगडाने मारहान करुन त्यांना गंभीर जखमी केले.

            अशा मजकुराच्या सतीश सुर्यवंशी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 323, 327, 506, 34 अंतर्गत तर नितीन कांबळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 323, 504, 506, 34 सह ॲट्रॉसिटी कायदा कलम- 3 अंतर्गत परस्परविरोधी 2 गुन्हे दि. 06.09.2022 रोजी नोंदवले आहेत.
 

From around the web