तुळजापुरात ए.टी.एम. केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले आणि ४० हजार गमावून बसले 

 
crime

तुळजापूर  : बसवंतवाडी, ता. तुळजापूर येथील- विलास श्रीरंग पाखरे, वय 52 वर्षे हे दि. 12.12.2022 रोजी 12.00 वा. सु. तुळजापूर येथील एस.बी.आय. एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना पैसे काढता येत नसल्याने त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या एका अनोळखी पुरुषाची  मदत घेतली असता त्या व्यक्तीने पाखरे यांना पैसे काढून दिले. 

परंतू दरम्यानच्या काळात पाखरे यांनी डेबीटकार्डचा टाकलेला पिन चोरुन पाहून नंतर पाखरे यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या डेबीटकार्डच्या रंगसंगतीचे दुसरे डेबीटकार्ड पाखरे यांना देउन काही कालावधीनंतर त्या अनोळखी व्यक्तीने पाखरे यांच्या डेबीटकार्डद्वारे बँक खात्यातील 40,000 ₹ रक्कम काढून घेउन पाखरे यांची फसवणूक केली. अशा मजकुराच्या विलास पाखरे यांनी दि. 14.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 चोरीचे दोन गुन्हे दाखल 

 उस्मानाबाद : सांगली (विटा), ता. खानापुर, जि. सांगली येथील- संभाजी काळासो पवार हे दि. 28.11.2022 रोजी 02.45 वा. सु. उस्मानाबाद बस स्थानकातील स्वच्छतागृहाच्या टेबलवर आपली पिशवी ठेउन आत गेले असता दरम्यानच्या काळात त्यांच्या पिशवीतील अंदाजे 10,000 ₹ किंमतीचा ओपो मोबाईल फोन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या संभाजी पवार यांनी दि. 14.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उमरगा : बेडगा, ता. उमरगा येथील- मंगल माणिकराव माने, वय 60 वर्षे या दि. 14.12.2022 रोजी 11.00 वा. सु. बेडगा गट क्र. 168 मधील आपल्या शेतात होत्या. यावेळी दोन अनोळखी इसमांनी तेथे येउन “डुक्कर मारणारे लोक इकडे आले आहेत का ?” असे मंगल यांना विचारले. यावर मंगल यांनी ते लोक पाहिले नसल्याचे त्यांना सांगूण शेतातील वासरास पाणी पाजण्यास घेउन जात असताना दोन अनोळखी इसमांनी पाठीमागून येउन मंगल यांचे डोळे झाकून, गळा दाबून त्यांच्या अंगावरील 4.5 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने जबरीने हिसकावून तेथून पसार झाले. अशा मजकुराच्या मंगल माने यांनी दि. 14.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web