वाशीत तरुणीवर लैंगिक अत्याचार

 
crime

वाशी  : एका तरुणाने गावातीलच एक 25 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) दि. 23.08.2022 रोजी अंघोळ करत असतांना तीचे  त्या तरुणाने मोबाईल फोनद्वारे छायाचित्र काढले. यानंतर रात्री 22.30 वा. सु. तीच्या घरात येउन ते छायाचित्र अन्यत्र प्रसारीत करण्याची धमकी त्या महिलेस देउन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. 

तसेच घटल्या प्रकाराची वाच्यता केल्यास त्याने त्या महिलेस ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दि. 08.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तीन ठिकाणी चोरी 

ढोकी  : कोंड, ता. उस्मानाबाद येथील- आण्णाप्पा नेमिनाथ कोरे यांच्या व त्यांच्या शेजारील शेतकरी अशा दोघांच्या कोंड शिवारातील शेत विहीरीतील लक्ष्मी कंपनीचा 7 अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पंप, ॲको व लक्ष्मी कंपनीचे 5 अश्वशक्ती क्षमतेचे दोन विद्युत पंप व बीबीसी कंपनीचा 3 अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पंप असे अंदाजे 37,000 ₹ किंमतीचे 4 विद्युत पंप अज्ञात व्यक्तीने दि. 05.09.2022 रोजी 19.00 वा. ते दि. 06.09.2022 रोजी 10.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या आण्णाप्पा कोरे यांनी दि. 08.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : तुळजापूर येथील- अरविंद पद्माकर सुरवसे यांची अंदाजे 40,000 ₹ किंमतीची होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एपी 943 ही दि. 07.09.2022 रोजी 11.30 वा. ते दि. 08.09.2022 रोजी 06.30 वा. दरम्यान मुर्टा येथील त्यांच्या मित्राच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या अरविंद सुरवसे यांनी दि. 08.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : बालाजीनगर, उस्मानाबाद येथील- विक्रांत भारत बोचरे यांची अंदाजे 30,000 ₹ किंमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एजी 4487 ही दि. 06.08.2022 रोजी 18.00 वा. ते 23.00 वा. दरम्यान बोचरे यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या विक्रांत बोचरे यांनी दि. 08.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web