मोटारसायकल खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू 
 

 
crime

वाशी  : ब्रम्हगाव, ता. वाशी येथील- रंजीत शेषेराव काळकुटे, वय 24 वर्षे हे दि. 26.10.2022 रोजी 21.00 वा. सु. पिंपळगाव (क.) गावतील रस्त्याने मोटारसायकल चालवत जात होते. यावेळी रस्ता वळणावर रंजीत यांनी मो.सा. निष्काळजीपने चालवल्याने ती अनियंत्रीत होउन रस्त्याबाजूच्या खड्ड्यात जाउन पडली. या अपघातात रंजीत हे स्वत: गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचे वडील शेषेराव सुखदेव काळकुटे, रा. ब्रम्हगाव यांनी दि. 27.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

फसवणूक

उमरगा  : आष्टाकासार, ता. लोहारा येथील- अभिजीत व्यंकट चौधरी यांनी दि. 15.09.2022 ते दि. 24.09.2022 रोजी दरम्यानच्या काळात 30 मेट्रीक टन तांदुळ एका ट्रक मधून गुजराज येथे पाठवला असता गोगन उल्वा, मेरु कोडीयातर व राणा मकवाना, तीघे रा. पोरबंदर, गुजरात यांनी संगणमताने त्या ट्रकला बनावट नंबर प्लेट लाउन तो ट्रक चौधरी यांनी ठरवून दिलेल्या ठिकाणी न नेहता ट्रकमधील नमूद तांदळाची परस्पर विल्हेवाट लावली. अशा मजकुराच्या अभिजीत चौधरी यांनी उमरगा न्यायालयात दिलेल्या निवेदनावरुन मा. न्यायालयाच्या आदेशावरुन दि. 26.10.2022 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

From around the web