उस्मानाबादेत मोटारसायकलच्या धडकेत शाळकरी मुलगी जखमी 

 
crime

उस्मानाबाद  : उस्मानाबाद येथील आसना शब्बीर शेख ही 13 वर्षीय मुलगी 7 मे रोजी 17.30 वा. श्रीपतराव भोसले या शाळेसमोरील रस्त्याने सायकल चालवत जात होती. यावेळी अज्ञात पुरुषाने निष्काळजीपने मोटारसायकल चालवल्याने आसना हिच्या सायकलला पाठीमागून धडकली. या अपघातात आसना हिच्या उजव्या हाताचे हाड मोडले. या अपघातानंतर तो अज्ञात चालक वाहनासह अपघात स्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या आसनाचे पिता- शब्बीर शेख यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338 सह मो.वा.का. कलम- 134, 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

नळदुर्ग : नळदुर्ग येथील शहाबउद्दीन शेख हे दि. 6 मे रोजी 17.00 वा. नळदुर्ग वेस जवळील महामार्गावरुन मोटारसायकलवर मित्र खामदेव घुगे, रा. हागलूर यास घेउन जात होते. यावेळी अज्ञात चालकाने निष्काळजीपने अशोक लेलँड ट्रक क्र. जी.जे. 1 एनटी 3527 हा चालवल्याने शेख यांच्या मो.सा. ला पाठीमागून धडकला. या अपघातात मोटारसायकलवरील शेख यांसह पाठीमागे बसलेले घुगे हे दोघे गंभीर जखमी होउन मोटारसायकलची मोडतोड झाली. या अपघातानंतर नमूद ट्रकचा अज्ञात चालक वाहनासह अपघात स्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या इम्तीयाज जहांगीर शेख यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338 सह मो.वा.का. कलम- 134, 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

From around the web