रस्त्यात वाहने अडवून लुटमार करणारी टोळी उस्मानाबादेत जेरबंद 

एकूण सहा आरोपीच्या मुसक्या आवळल्या, तीन ट्रक, आणि दोन  मोटारसायकल जप्त  
 
s

उस्मानाबाद - आरटीओची भीती दाखवून  रस्त्यात वाहने अडवून लुटमार करणारी टोळी  जेरबंद करण्यात उस्मानाबाद पोलिसांना यश आले आहे. आतापर्यंत सहा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून  तीन ट्रक, आणि दोन  मोटारसायकल जप्त  करण्यात आल्या आहेत.


नवाब गड्डा, रायचूर, राज्य- कर्नाटक येथील- सय्यद सज्जाद पाशा, वय 38 वर्षे, हे ट्रक क्र. ए. पी. 39 टीझेड 5116 ही चालवत आंध्रप्रदेश ते जालना असा प्रवास करत असताना दि. 03.09.2022 रोजी 13.30 वा. सु. वाशी तालुक्यातील यशवंडी फाटा येथे आले असता दोन अनोळखी परुषांनी सय्यद पाशा यांचा नमूद ट्रक थांबवून, “आगे आरटीओ पोलीस है, वह फाईन डाल रहे है, थोडी देर रुककर चले जाव.” असे त्यांना म्हणाले. यावर सय्यद पाशा यांना रत्याबाजूस अगोदरच दोन ट्रक उभा असल्याचे दिसल्याने त्यांना खात्रीपटल्याने त्यांनी आपला ट्रक रस्त्याबाजूस थांबवला असता त्या दोन अनोळखी पुरुषांसह अन्य चार पुरुषांनी सय्यद पाशा यांना धमकावून त्यांच्या सदऱ्याच्या खिशातील  9,000 ₹ रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेउन ते सहा पुरुष तेथून पसार झाले. यावर सय्यद पाशा यांनी वाशी पोलीस ठाणे गाठून गुन्हा क्र. 231/2022 हा भा.दं.सं. कलम- 395 हा गुन्हा रात्री 22.23 वा. सु. नोंदवला आहे.

            गुन्हा तपासादरम्यान पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी व  अपर पोलीस अधीक्षक  नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक यांचे वाचक- सपोनि . अमोल पवार, सपोनि- . सुदर्शन कासार, पोउपनि . संदीप ओहोळ, पोकॉ- दिनेश जमादार यांसह पोलीस मुख्यालयातील 15 पोलीस अंमलदार यांच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दीच्या व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नमूद गुन्ह्यातील आरोपी- 1)अलीखान हुसेन अफजल हुसेन, वय 32 वर्षे, 2)जाण अली जहर अली, वय 25 वर्षे, दोघे रा. अकोला 3)मिर्झा जावेद अली यावर अली, वय 45 वर्षे 4)अन्वर अली किस्मत अली, वय 30 वर्षे, दोघे रा. गेवराई, जि. बीड 5)युसूफ शराफत अली, वय 41 वर्षे, रा. अंबड, जि. जालना 6)गूलाब जाफर हुसेन, वय 48 वर्षे, रा. मोहोळ, जि. सोलापूर या सर्वांना काल दि. 04.09.2022 रोजी रात्री 02.17 वा. सु. यशवंडी शिवारातून अटक करुन लुटीतील नमूद रक्कम व गुन्हा करण्यास वापरलेले 3 ट्रक, 2 मोटारसायकल जप्त केल्या आहेत. गुन्ह्यातील त्यांच्या उर्वरीत साथीदारांचा पोलीस शोध घेत आहे

From around the web