तामलवाडी पोलीस ठाण्यात धुडगुस करणा-यावर गुन्हा दाखल

 
crime

तामलवाडी  :  देवकुरुळी येथील राजकुमार सोपान बोचरे यांनी दिलेल्या तक्रार अर्जासंबंधीच्या  कार्यवाहीस  त्यांच्यासह त्यांचे भाउ-विठठल सोपान बोचरे यांना तामलवाडी पोलीस ठाण्यात दिनांक 12 मार्च रोजी 13.00 वा बोलावण्यात आले होते. यावेळी दोन्ही भावांत पुन्हा वाद उफाळुन राजकुमार यांसह त्यांची पत्नी -सुलोचना व विठठल यांसह त्यांची पत्नी -अलका या दोन्ही कुटुंबीयांनी परस्पर विरोधी कुटुंबीयांस मारहाण करण्याच्या उददेशाने गचांडया धरुन, विनाकारण आरडाओरड करुन व पोलीस ठाण्यात धुडगुस घालुन सार्वजनिक शांतता भंग केला. याप्रकरणी पोलीस नाईक संजय राठोड यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरे वरुन भा द सं कलम 160 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 चोरी

परंडा  : वाकडी शिवारातील गट क्रमांक 352 मधील ईश्वर रणपिसे यांच्या शेतातील ज्वारी पीक दिनांक 10 मार्च रोजी 11.00 वा गावकरी गणेश व अमोल शहाजी वळेकर या दोघा बंधुनी ईश्वर यांच्या नकळत कापले. तसेच गावातील एका मळणी यंत्राच्या सहाय्याने  मळणी करुन सुमारे 14 क्विंटल धान्य एका ग्रामस्थाच्या पिकअप मधुन वाहुन नेउन त्या पिकाची चोरी केली. अशा मजकुराच्या ईश्वर यांच्या दि.12 मार्च रोजीच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web