उस्मानाबादेत अवैध गुटखा बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
crime

उस्मानाबाद  : उस्मानाबाद येथील- वैभव शामराव देवगिरिकर, वय 42 वर्षे यांनी दि.  09.11.2022 रोजी 13.30 वा. सु. शहरातील आपल्या संगम पान स्टॉलमध्ये गुटखा, तंबाखुजन्य पदार्थ असा एकुण 5,397 ₹ किंमतीचा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ विक्री करण्यासाठी बाळगलेले असताना अन्न व औषध प्रशासन विभाग, उस्मानाबाद यांच्या पथकास आढळले. 

यावरून पथकाने तो माल जप्त करुन अन्नसुरक्षा अधिकारी श्रीमती- नसरीन तनवीर मुजावर यांनी दि. 09.11.2022 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.दं.सं. कलम- 272, 273, 188, 328 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम- 26 (2) (iv), 27 (3) (c) सह वाचन अधिनियमांतर्गत 321/2022 हा गुन्हा आनंदनगर पो.ठा. येथे नोंदवला आहे.

 आयशर टॅम्पो चोरीस 

 तामलवाडी : काटी, ता. तुळजापूर येथील- बालाजी दत्तु ढगे यांचा अंदाजे 9,00,000 ₹ किंमतीचा आयशर टॅम्पो वाहन क्र. एम.एच. 12 पीक्यु 2413 हा दि. 08.11.2022 रोजी 18.00 ते दि. 09.11.2022 रोजी 10.00 वा. दरम्यान काटी येथील जमदाडे पेट्रोलियम किरकोळ विक्री केंद्राच्या आवारातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या बालाजी ढगे यांनी दि. 09.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 

From around the web