लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल
भूम : जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालय, भुम येथील कर्मचारी- खासेराव मच्छींद्र गलांडे हे दि. 18.11.2022 रोजी 10.45 वा. सु. आपल्या कार्यालयात दैनंदीन कामकाज करत होते. यावेळी आंद्रुड, ता. भुम येथील- ज्ञानेश्वर सोपान गिते यांनी तेथे जाउन, “तुम्ही माझा फोन का उचलत नाही व मी केलेल्या रस्ता दुरुस्तीच्या कामामध्ये एक कोटीचे नुकसान केले आहे.” असे गलांडे यांना दरडावून त्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. अशा प्रकारे गिते यांनी गलांडे यांच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या खासेराव गलांडे यांनी दि. 21.11.2022 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 332, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
अपघातात एक ठार
वाशी : गोलेगाव, ता. वाशी येथील- सुनिता दत्तात्रय चव्हाण, वय 31 वर्षे या दि. 17.11.2022 रोजी 02.00 वा. सु. इसरुप फाटा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 लगत असताना अज्ञात चालकाने अज्ञात वाहन निष्काळजीपने चालवल्याने सुनिता चव्हाण यांना पाठीमागून धडकले. या अपघातात सुनिता या गंभीर जखमी होउन मयत झाल्या. या अपघातानंतर अज्ञात वाहनाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयतेचे पिता- भागवत एकनाथ निरपळ, रा. भुम यांनी दि. 21.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ) (ब), 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.