आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
उमरगा : नारंगवाडी, ता. उमरगा येथील- शालीनी फत्तेपुरे, दिनकर फत्तेपुरे, दयानंद पाटील, गजानंद पाटील, गुंडेराव पाटील, किसन मुगळे, आनंद फत्तेपुरे या सर्वांच्या दि. 01.08.2021 पासूनच्या त्रासास कंटाळून गावकरी- दिगंबर माधव लोहार, वय 45 वर्षे यांनी दि. 27.11.2022 रोजी शेतातील झाडास गळफास घेउन आत्महत्या केली. अशा मजकुराच्या दत्तात्रय माधव देशमुख (लोहार), रा. नारंगवाडी यांनी दि. 28.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
हुंडाबळी
मुरुम : मुरुम, ता. उमरगा येथील- शिल्पा अभिजीत कौलकर, वय 24 वर्षे यांनी दि. 27.11.2022 रोजी 18.00 वा. सु. मुरुम येथील राहत्या घरात ओढणीने गळफास घेउन आत्महत्या केली. शिल्पा व अभिजीत यांच्या विवाहात मानपान व सुवर्ण दागिने न दिल्याच्या कारणावरुन 1)अभिजीत दिलीप कौलकर (पती) 2)दिलीप कौलकर (सासरे) 3)उज्वला कौलकर 4)जिनेंद्र कौलकर या सर्वांनी शिल्पा हिस दि. 01.06.2022 रोजी पासून वेळोवेळी शारिरीक व मानसिक त्रास दिला. या त्रासास कंटाळून शिल्पा यांनी आत्महत्या केली. अशा मजकुराच्या शिल्पा यांची आई- शोभा शैलेंद्र भसमे, रा. सास्तुर, ता. लोहारा यांनी दि. 28.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 304 (ब), 498 (अ), 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.