उस्मानाबाद जिल्ह्यात निष्काळजीपणाचे कृत्य करणाऱ्यावर गुन्हे दाखल

 
crime

उस्मानाबाद  : सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणे, बेदरकारपणे वाहन चालवने व सार्वजनिक ठिकाणी हातगाड्यावरील शेगडीत निष्काळजीपने अग्नि प्रज्वलीत करणे. अशा प्रकरणी उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 30 जुलै रोजी खालील प्रमाणे कारवाया केल्या.

1) येणेगुर, ता. उमरगा येथील जाफर शेख व ज्ञानेश्वर सोनटक्के या दोघांनी आपापल्या ताब्यातील ॲपे रीक्षा येणेगुर येथील राष्ट्रीय महामार्गावर तर तडवळे (क.) येथील जावेद शेख यांनी आपले बोलेरो वाहन ढोकी पेट्रो पंप चौकातील सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरित्या उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले.

2) वासुदेव गल्ली, तुळजापूर येथील राजु चव्हाण यांनी क्रुझर वाहन हे तुळजापूर येथील छ. शिवाजी महारा चौकातील रस्त्यावर मानवी जिवीतास धोका होईल अशा निष्काळजीपने चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केले.

3) सातेफळ, ता. कळंब येथील शंकर गरड यांनी गावातील आपल्या वॉशिंग सेंटरमध्ये 8 लि. पेट्रोल हा ज्वलनशिल पदार्थ बाळगुन त्यामुळे मानवी जिवीतास धोका होईल किंवा वित्त हानी होउ शकेल याची जाणीव असतानाही त्यांनी नमूद ज्वलनशिल पदार्थ बाळगुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले.

            यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द संबंधीत पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.

 

From around the web