उस्मानाबादेत तलवारीचा धाक दाखवणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल 

 
crime

उस्मानाबाद : आनंदनगर पो.ठा. चे पथक दि. 18.01.2023 रोजी 01.45 वा. सु. शिगोंली येथे रस्त्यावर रात्रगस्तीस असताना शिगोंली, ता. उस्मानाबाद येथील- शिवलिगं गोवर्धन गुळमिरे हा दारूचे सेवण करून स्वताचे कब्जात तलवार बाळगुन त्यांची पत्नी भाग्यश्री व इतर लोकांना तलवारीचा धाक दाखवून मोठमोठ्याने शिवीगाळ करून सार्वजनिक शांतता भंग करून तसेच सरकारी काम करत असतांना कामात हरकत केली. वरून पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन शस्त्र कायदा कलम- 4, 25 (1-ब) (ब) सह भा.द.सं. कलम 504, 506, 506, 186 मो.वा.का. कलम85(1) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण 
 

उस्मानाबाद  : जुनोनी , ता. उस्मानाबाद येथील- लक्ष्मण खैरे,खंडू खैरे यांनी जुन्या भांडणाचे कारणावरून दि. 16.01.2023 रोजी 19.00 वा.सु. जुनोनी  शिवारात गावकरी- रमेश संदिपान दाभाडे व त्यांचे वडील संदिपान दाभाडे हे शेताकडून रोडने घराकडे मोसावर जात होते. नमूद दोघांने त्यांची मोटर सायकल आडवून शिवीगाळ करून जिवे मरण्याची धमकी दिली. व संदीपान यांच्या गळ्यावर कटरने मारून जखमी केले. तर रमेश हे वडीलांचे बचावास आले असता. लक्ष्मण यांनी रमेशच्या दोन्ही हाताचे मनगटावर कटरने मारून जखमी केले. अशा मजकुराच्या रमेश दाभाडे यांनी दि.18.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 341, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web