निष्काळजीपने वाहन चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
crime

तामलवाडी  : सोलापूर येथील- शिवानंद शिवलिंगय्या स्वामी, वय 52 वर्षे यांनी दि. 21.10.2022 रोजी 18.20 वा. सु. तामलवाडी टोल नाका येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर मोटारसायकल क्र. एम.एच. 13 बीई 3604 ही भरधाव वेगात निष्काळजीपने भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द तामलवाडी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

अपघातात एक जखमी 


कळंब  : अंबरगे, ता. बार्शी येथील- रामचंद्र महादेव कदम, वय 28 वर्षे हे दि. 14.10.2022 रोजी 18.00 वा. सु. कन्हेरवाडी फाटा येथील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 13 सीवाय 2006 ही चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने बोलेरो वाहन क्र. एम.एच. 25 एन 4453 ही चुकीच्या दिशेने निष्काळजीपने चालवल्याने रामचंद्र कदम यांच्या नमूद मो.सा. ला समोरुन धडकली. या अपघातात रामचंद्र यांच्या उजव्या पायाचे हाड मोडून ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या रामचंद्र कदम यांनी दि. 21.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मोटारसायकलची चोरी 
 
उस्मानाबाद  : उस्मानाबाद येथील- प्रविण श्रीरंग जमादार यांची अंदाजे 20,000 ₹ किंमतीची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. 25 डब्ल्यु 3513 ही दि. 19.10.2022 रोजी 15.00 ते 19.00 वा. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रविण जमादार यांनी दि. 21.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                      

From around the web