गांजाची अवैध लागवड करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
crime

उमरगा : उमरगा तालुक्यातील थोरलेवाडी शिवारात शेत मालक- सायबण्णा भानुदास चिंचोळे, वय 38 वर्षे यांनी गांजा या अंमली वनस्पतीची अवैध लागवड केल्याची विश्वसनीय खबर पोलीसांना मिळाली होती. यावर उमरगा पो.ठा. चे पोनि- मनोज राठोड, सपोनि- महेश क्षिरसागर, पोलीस अंमलदार- कोळी, घोलसगाव, अवचार यांसह तहसील कार्यालय, उमरगा येथील नायब तहसीलदार- श्री. काजळे व शासकीय दोन पंच यांच्या उपस्थितीत दि. 26.09.2022 रोजी 16.15 वा. सु. नमूद शेतात पोलीस पथकाने छापा टाकला. यावेळी तेथील सोयाबिन पिकात गांजाची लहान- मोठी अशी एकुण 91 झाडे आढळली. ही गांजाची झाडे पथकाने मुळासकट उपटून जप्त केली असता त्यांचे वजन 820 ग्रॅम इतके आढळले. यावरुन उमरगा पो.ठा. चे पोलीस अंमलदार- दिगंबर सुर्यवंशी यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन सायबण्णा चिंचोळे यांच्याविरुध्द उमरगा पो.ठा. येथे गु.र.क्र. 505 / 2022 हा नार्कोटीक्स ड्रग्ज ॲन्ड सायकोट्रॉपीक सबस्टान्स ॲक्ट (एनडीपीसएस ॲक्ट) कलम- 20 (अ) नुसार गुन्हा नोंदवला आहे.

From around the web