मद्यपी चालकावर गुन्हा दाखल
कळंब : कळंब येथील- शिवाजी बाजीराव वाकळे यांनी दि. 07.10.2022 रोजी 19.00 वा. सु. कळंब बस स्थानकासमोरील सार्वजनिक रस्त्यावर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एयु 8089 ही मद्यधुंद अवस्थेत चालवून मोटार वाहन कायदा कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द कळंब पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा दाखल
लोहारा : धानुरी, ता. लोहारा येथील- बालाजी विश्वनाथ थोरात यांनी दि. 07.10.2022 रोजी 11.00 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक, धानुरी येथील सार्वजनिक रस्त्यावर ॲपे रीक्षा क्र. एम.एच. 25 एन 631 हा रहदारीस धोकादायकरित्या उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द लोहारा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.