परंड्यात अवैधरित्या तलवार बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
crime

उस्मानाबाद  : . पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी आज दि. 14.10.2022 रोजी परंडा तालुक्यात गस्तीस होते. दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की, परंडा तालुक्यातील जवळ (नि.) ग्रामस्थ- सौरभ लक्ष्मण रोडे हा दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने अवैधरित्या तलवार बाळगून आहे. यावर पथकाने जवळा (नि.) गावातून सौरभ यास ताब्यात घेउन त्याच्या ताब्यातून तलवार हस्तगत करुन त्याच्याविरुध्द परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 301/2022 हा शस्त्र कायदा कलम- 4/25 अंतर्गत नोंदवला आहे.

            सदरची कामगिरी .पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी . अपर पोलीस अधीक्षक  नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन स्था.गु.शा. च्या पोनि-  यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि- श्री. संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार- विनोद जानराव, अमोल निंबाळकर, महेबूब अरब, भालचंद्र काकडे, अजित कवडे, नितीन जाधवर यांच्या पथकाने केली आहे.

From around the web