उमरग्यात अवैध गुटखा वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल
उमरगा : उमरगा पोलीस ठाण्याचे पथक दि. 13.09.2022 रोजी हद्दीत रात्रगस्तीस असताना गस्ती दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की, गुलबर्गा ते लातुर रस्त्याने ट्रक क्र. एम.एच. 15 बीजे 4741 यामधून अवैध गुटखा वाहुन नेला जात आहे. यावर पथकाने नमूद रस्त्यावर सापळा लाउन पहाटे 05.00 वा. सु. नमूद ट्रक थांबवला. यावेळी ट्रकमध्ये असलेले चालक- महमंद रियाज बाबुमिया सौदागर, रा. छिंद्री कॉलनी, बिदर, राज्य- कर्नाटक यांच्याकडे पोलीसांनी ट्रकमधील पोत्यांविषयी विचारपुस केली.
एकंदरीत त्या ट्रकमधून एकुण 360 पोत्यांत नजर गुटखा असा 40,32,000 ₹ किंमतीचा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ वाहतूक नेत असल्याचे आढळले. यावर पथकाने नमूद गुटखा व वाहतुकीस वापरलेला ट्रक असा एकुण 50,32,000 ₹ चा माल जप्त करुन अन्न व औषध प्रशासन विभागास कळवून अन्न सुरक्षा अधिकारी- नसरीन तनवीर मुजावर यांनी नमूद गुटखा हा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत असल्याची खात्री करुन त्यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महमंद सौदागर यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 272, 273, 188, 328 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम- 26 (2) (iv), 27 (3) (e) सह वाचन अधिनियमांतर्गत 490/2022 हा गुन्हा उमरगा पोलीस ठाण्यात काल दि. 14 सप्टेंबर रोजी नोंदवला आहे.
सदरची कामगीरी ही . पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन उमरगा उप विभागाचे पोलीस उप अधीक्षक रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली उरमगा पो.ठा. चे पोनि-. मनोज राठोड, सपोनि- महेश क्षिरसागर, पोउपनि- रमाकांत शिंदे, पोलीस अंमलदार- शिंदे, गायकवाड यांच्या पथकाने केली असून गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि- महेश क्षिरसागर हे करीत आहेत.