उस्मानाबादेत अवैध गुटखा वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
s

उस्मानाबाद  :  स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कारवाई करण्यासाठी दि. 12 ऑगस्ट रोजी उस्मानाबाद तालुक्यात गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की, औसा ते उस्मानाबाद रस्त्याने अशोक लिलॅण्ड टेम्पो क्र. एम.एच. 13 ए एक्स 9252 यामधून अवैध गुटखा वाहुन नेला जात आहे. 

यावर पथकाने सकनेवाडी शिवारातील नमूद रस्त्यावर सापळा लाउन 18.30 वा. सु. नमूद टेम्पो थांबवला. यावेळी टेम्पोमध्ये असलेल्या चालक- दिपक तानाजी पवार, रा. तेर, ता. उस्मानाबाद व त्यांचा सहकारी आबासाहेब विष्णू वाघमोडे, रा. गोवर्धनवाडी, ता. उस्मानाबाद यांच्याकडे पोलीसांनी टेम्पोतील पोत्यांविषयी विचारपुस केली. एकंदरीत त्या टेम्पोमधून एकुण 15 पोत्यांत गुटख्याची पुडकी असा 3,35,100 ₹ किंमतीचा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ वाहतूक ओत असल्याचे आढळले. यावर पथकाने नमूद गुटखा व वाहतुकीस वापरलेला टेम्पो असा एकुण 6,35,100 ₹ चा माल जप्त करुन दिपक पवार व आबासाहेब वाघमोडे या दोघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 328, 272, 273, 188, 34 अंतर्गत उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाण्यात काल दि. 07 जुलै रोजी गुन्हा नोंदवला आहे.

            सदरची कामगीरी ही . पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्था.गु.शा. चे पोनि- रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ- जानराव, अरब, पोना- कवडे, जाधवर, काकडे यांच्या पथकाने केली आहे.

From around the web