सुनेचा छळ केल्या प्रकरणी सासू-सासऱ्यासह पती, नणंद व दिर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

 
Osmanabad police

उस्मानाबाद  - एका २५ वर्षीय सुनेच्या चारित्र्यावर संशय घेऊन पिकअपचे हप्ते भरण्यासाठी माहेरून पैसे आण असा तगादा लावून छळ केला. या  प्रकरणी छळ करणाऱ्या पतीसह सख्खे व चुलत सासू-सासरे, नणंद‌ व दिर अशा ७ जणांविरुध्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर येथील एका २५ वर्षीय सुनेला  सासरच्यांनी १ वर्ष चांगले नादविले. परंतू नंतर तिचे पती तिला लहान सहान गोष्टीवरून शिवीगाळ करून माराहान करु लागले. तर तिचे सासरे देखील घालून-पाडून बोलू लागले व तेही तिला मारहान करू लागले. तसेच चुलत सासरे अमोल संदीपान थोरात, सासु जयश्री संदीपान थोरात हे देखील तिला वागायला चांगली नाही, असे म्हणून शिवीगाळ करु लागले.

 तर दि १९ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास तिच्या सासऱ्याने तिच्या चारीत्र्यावर संशय घेवून तिच्या केसाला धरून डाव्या हाताला चावुन केस ओढले. तसेच तुला मी आता जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. तेवढ्यात तिचा पती संतोषने जोर जोरात अंगावर लाथा मारुन शिवीगाळ करीत  काठी व लोखंडी रॉडने तिच्या पाठीवर, हातावर व पायावर जब्बर मुक्का मार दिला. तसेच जवळ उभी असणाऱ्या सासु सुनंदाने शिवीगाळ केली.

 तर चुलत सासरे संदीपान शंकर थोरात, चुलत सासु जयश्री थोरात, दिर अमोल थोरात यांनी तिला हिचा हा रोजचा कालवा आहे, हिच्या अंगात चालच आहे, हिच्याकडे जरा चांगलेच बघावे लागेल असे म्हणुन शिवीगाळ केली. तर तिच्या सासरच्या लोकांनी तिला वारंवार माहेरहुन पिकअपचे हप्ते भरण्यासाठी पैसे आण म्हणून शारीरीक, मानसिक त्रास देवून उपाशी पोटी ठेवले. त्यामुळे याबाबत तिने तिच्या आई आहुबाई व्यंकट सोलनकर, वडील व्यंकट विठ्ठल सोलनकर रा. तुगाव ता. उमरगा यांना सांगुन तिच्या सासरच्या लोकांना समजवायचा प्रयत्न केला होता. परंतू त्यांनी तिला पैसे घेवून ये तरच तुला नांदवितो नाहीतर नांदविणार नाही असे सांगितले. 

त्यामुळे तिला मारहान करून शिवीगाळ करणारे व माहेरहून पैसे घेऊन ये म्हणून शारीरीक व मानसिक त्रास करणाऱ्या लोकांवर कार्यवाही अशी तक्रार ढोकी पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात भादंवि कलम‌१८६० चे ४९८ (अ), ३२४, ३२३, ५०४, ५०६ व ३४ अन्वये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

From around the web