शासकीय कामात अडथळा केला म्हणून आठ जणांविरुद्ध नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
नळदुर्ग - तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथील ग्रामसेवक आणि महसुल विभागाच्या व पोलीस विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांस धक्काबुक्की करुन त्यांच्या शासकीय कामात जाणीवपुर्वक अडथळा केला म्हणून आठ जणांविरुद्ध नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तुळजापूर तालुक्यातील निलेगाव ग्रामस्थ- मालु दुधभाते, वय 75 वर्षे हे मयत झाल्याने त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी प्रशासनाने ठरवून दिलेल्या जागेत न करता तो पुर्वीप्रमाणे चालत आलेल्या जागेतच अंत्यविधी करण्याचा आग्रह मयत- मालु दुधभाते यांच्या नमूद नातेवाईकांनी धरला होता. यावर दुधभाते कुटूंबीयांसह निलेगावचे ग्रामसेवक- संजय घोगरे यांसह महसुल पथकाचे अधिकारी- कर्मचारी व नळदुर्ग पो.ठा. चे अधिकारी- अंमलदार यांनी मयताचे नातेवाईकांस समजावून सांगीतले.
परंतु त्यांनी प्रशासनाचे म्हणने न ऐकता प्रशासनास वेठीस धरुन महसुल विभागाच्या व पोलीस विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांस धक्काबुक्की करुन त्यांच्या शासकीय कामात जाणीवपुर्वक अडथळा केला. अशा मजकुराच्या ग्रामसेवक- संजय घोगरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरवेरुन १ ) दगडु दुधभाते 2)नामदेव दुधभाते 3)पिंडु दुधभाते 4)हणुमंत सोनटक्के 5)शंकर जमादार 6)बसवराज जमादार 7)निर्मलाबाई मोरे 8)माळाप्पा बंदीछोडे, सर्व रा. निलेगाव, ता. तुळजापूर यांच्याविरुद्ध गुन्हानोंदवण्यात आला आहे.