तुळजापुरात महिलेला अश्लील हावभाव करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल
तुळजापूर - येथील एक महिला दि. 16.02.2022 रोजी 22.15 वा. सु. घरासमोरील रस्त्यावर शतपावली करत असतांना मोटारसायकल क्र. एम.एच. 14 एडी 3274 वर आलेल्या तुषार सगट व महादेव रसाळ या दोघांनी त्या महिलेस हाताने अश्लील इशारा केला.
यावर त्या महिलेसह तीच्या पती व दिराने त्यांना जाब विचारला असता त्या दोघांनी त्या तीघांना अश्लील शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संबंधीत महिलेने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 509, 294, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
चोरी
बेंबळी : समुद्रवाणी, ता. उस्मानाबाद येथील सोमनाथ शंकर मनसुळे यांच्या समुद्रवाणी व कामेगाव शिवारातील शेत शेजारी तेरणा नदी पात्र आहे. त्या पात्रातील त्यांचा 5 अश्वशक्ती क्षमतेचा पाणबुडी विद्युत पंप तसेच त्यांचे शेजारील शेतकरी- गणेश फावडे, बालाजी गव्हाणे, लक्ष्मण गव्हाणे, भारत गव्हाणे यांचे प्रत्येकी एक विद्युत पंप आणि धर्मराज मुंडे व निती मुंडे यांच्या विहीरीतील दोन पानबुडी पंपाच्या नळ्या दि. 16- 17.02.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या सोमनाथ मनसुळे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
रस्ता अपघात
ढोकी : मंजू तांडा, ता. मुखेड, जि. नांदेड येथील देवीदास शंकर चव्हाण, वय 31 वर्षे हे दि. 13.02.2022 रोजी 22.30 वा. सु. ढोकी शिवारातील तडवळा रस्त्याने ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एच 6437 हा चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने इंडीगो कार क्र. एम.एच. 39 डी 1323 ही निष्काळजीपने चालवल्याने ती अनियंत्रीत होउन देवीदास चव्हाण यांच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडकली. या अपघातात इंडीगो कार चालक स्वत: जखमी होउन चव्हाण यांच्या ट्रॅक्टर सह कारचे आर्थिक नुकसान झाले. अशा मजकुराच्या देवीदास चव्हाण यांनी दि. 17.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.