परंडा पोलीस गाडीचा दिवा फोडणा-यांवर गुन्हा दाखल 

 
crime

परंडा  : परंडा  पोलीस ठाण्याचे पथक दि.21 मार्च रोजी 9 वाजता शहरात शासकीय वाहन क्रमांक एम.एच.25 सी. 6605 मधुन गस्त करत होते. यावेळी पथकाने रस्त्यातील गर्दी बाजुस सारुन रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला असता चिडुन जाउुन अरबाज पठाण व इरफान मनियार या दोघांनी पोलीस गाडीच्या छतावरील पेालीस दिवा दगड फेकुन मारुन फोडला. या प्रकरणी पोलीस हवालदार शबाना मुल्ला यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 427 सह सार्वजनीक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा कलम 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 धोकादायकपणे अग्नी प्रज्वलीत करणा-यावर कारवाई

मानवी जिवीतास, मालमत्तेस धोका होईल अशा प्रकारे सार्वजनीक ठिकाणी अग्नी प्रज्वलीत करणा-या अलीम शेख, विकास गायकवाड, अविनाश लोखंडे, शिवाजी गायकवाड  या 4 हातगाडा चालकांविरुध्द कळंब पोलीसांनी काल दि.21/03/2022 रोजी भा.द.सं कलम 285 नुसार 4 गुन्हे तर बेंबळी पोलीसांनी धोंडोपंत कुलकर्णी यांच्या विरुध्द 1 गुन्हा नोंदवला आहे.


रस्ता अपघात

उमरगा  : तुरोरी येथील कमलाकर राठोड हे दि.20 मार्च रोजी 12.30 वाजता राष्ट्रीय महामार्गावरुन पायी जात असताना अज्ञात चालकाने एम.एच्‍ 12 एम.आर 527 ही कार निष्काळजीपणे चालवल्याने राठोड यांना पाठीमागुन धडकली. या अपघातात राठोड यांच्या उजव्या पायाची नडगी मोडली.  अशा मजकुराच्या कमलाकर राठोड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम, 279,337,338 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापुर  : परभणी येथील क्रष्णा राठोड हे  दि. 21 मार्च रोजी 12.30 वाजता अपसिंगा शिवारातील राष्ट्रीय महामार्गावरुन मोटार सायकल चालवत जात असताना अज्ञात चालकाने एम.एच्‍ 44 6690 हा मिनी ट्रक निष्काळजीपणे चालवल्याने राठोड यांच्या मोटार सायकलला समोरुन धडकला. या अपघातात राठोड हे गंभीर जखमी होवुन दवाखान्यात नेताना मयत झाले.  अशा मजकुराच्या पत्नी- गवळण राठोड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम, 279,304 अ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web