केतकी चितळेवर उस्मानाबादेत गुन्हा दाखल

उस्मानाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह ,अभद्र आणि विकृत भाषेत फेसबुकवर टीका केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर उस्मानाबादेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.केतकीवर राज्यात आतापर्यंत १३ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
केतकी चितळे हिने दि. 13 मे रोजी रात्री शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह ,अभद्र आणि विकृत भाषेत टिका केली होती. ही टिका बदनामी करण्याच्या उद्देशाने व दोन राजकीय पक्षांमध्ये वैमनस्य निर्माण निर्माण करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक करण्यात आली आहे. अशा मजकुराची तक्रार रोहीत बागल, रा. बागल गल्ली , उस्मानाबाद यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 153 (अ), 500, 501, 502 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अभिनेत्री केतकी चितळे सध्या ठाणे पोलिसांच्या ताब्यात असून १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.तिची वाटचाल गुणरत्न सदावर्ते यांच्या पाऊलावर सुरू आहे.