अपहार प्रकरणी गटविकास अधिकारी सुरेश तायडे यांच्यासह बारा जणांविरुद्ध गुन्हा दखल 

 
crime

उस्मानाबाद :  उस्मानाबाद तालुक्यातील पवारवाडी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या ३१ लाखाच्या अपहार प्रकरणी  प्रभारी गटविकास अधिकारी  सुरेश तायडे, लेखा अधिकारी आर.जे. लोध यांच्यासह बारा जणांविरुद्ध आनंदनगर पोलीस स्टेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

1) सुरेश तायडे, प्रभारी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, उस्मानाबाद 2) आर.जे. लोध, सहायक लेखा अधिकारी 3)अंगद आगळे, तत्कालीन ग्रामसेवक 4) अशोक मुंडे, ग्रामरोजगार सेवक 5) स्वाती कांबळे, कंत्राटी सहायक 6) विश्वनाथ राउत, कंत्राटी कारकुन 7) प्रभावती लोहार, 8) सोमनाथ लोहार 9) अनुराधा रणसिंग 10) विजयकुमार रणसिंग 11) अश्विन गायकवाड 12) रोहीत नवले या सर्वांनी संगणमताने ग्रामपंचायत कार्यालय, पवारवाडी व पंचायत समिती, उस्मानाबाद येथे दि. 19.12.2022 रोजी पुर्वी एकुण 30,98,092 ₹ रकमेचा अपहार केला असल्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या पत्रकान्वये सुचित केल्याप्रमाणे तसेच  तहसिलदार, उस्मानाबाद यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालामध्ये निष्पन्न झाले. यावरुन उस्मानाबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, नंदकिशोर शेरखाने यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 406, 409, 465, 464, 468, 470, 471, 477 (अ), 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
दोन ठिकाणी चोरी 

 उमरगा  : बलसुर, ता. उमरगा येथील- विनय व्यंकट वाकडे यांची आजी दि. 18.12.2022 रोजी 23.30 वा. ते दि. 19.12.2022 रोजी 01.10 वा. दरम्यान बलसुर येथील विनय यांच्या घरी खिडकीजवळ झोपलेल्या होत्या. दरम्यान अज्ञात व्यक्ती खिडकीतून हात घालून विनय यांच्या आजीच्या हातातील अंदाजे 1,50,000 ₹ किंमतीच्या सुवर्ण पाटल्या कापत असताना आजीला जाग आली. यावेळी आजी यांनी आरडा-ओरड करण्यास सुरवात केली असता त्या अज्ञात व्यक्तीने आजील ठार मारण्याची धमकी देउन त्यांच्या हातातील पाटल्या बळजबरीने लुटून नेल्या. अशा मजकुराच्या विनय वाकडे यांनी दि. 20.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. च्या अणदुर शाखेच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 19.12.2022 रोजी 17.30 ते दि. 20.12.2022 रोजी 06.45 वा. दरम्यान तोडून बँकेतील कपाटाचे नुकसान करुन तिजोरी उघडण्याचा प्रयत्न करुन चोरीचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या बँक कर्मचारी- गुलाब विनायक औरादे, रा. उमरगा यांनी दि. 20.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 511, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web