येरमाळ्याजवळ बसला ट्रकची धडक, चालकासह ९ प्रवासी जखमी 

 
crime

येरमाळा  : राज्य परिवहन महामंडळाच्या कळंब आगाराचे चालक- पांडुरंग दत्तु चौधरी, वय 49 वर्षे हे दि. 10 मे रोजी 11.45 वा. सु. परतापुर येथील रस्त्याने एसटी बस क्र. एम.एच. 20 बीएल 2590 ही चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने मिनी ट्रक क्र. एम.एच. 11 टी 2026 ही निष्काळजीपने चालवल्याने समोरील वाहनास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात नमूद एसटी बसला समारुन धडकली. या अपघातात चालक- पांडुरंग चौधरी यांसह बस मधील 9 प्रवासी किरकोळ व गंभीर जखमी होउन बसचे आर्थिक नुकसान झाले. अशा मजकुराच्या पांडुरंग चौधरी यांनी दि. 11 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 427 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


उस्मानाबाद  : उस्मानाबाद येथील सोमनाथ बालाजी पांढरे हे दि. 10 मे रोजी 22.30 वा. सु. शहरातील प्रतीभा हिरो शोरुम समोरील रस्त्याने पायी जात असतांना अज्ञात व्यक्तीने अज्ञात वाहन निष्काळजीपने चालवल्याने पांढरे यांना पाठीमागून धडकल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या सोमनाथ पांढरे यांनी दि. 11 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web